Yuri Alemao On BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्या'! LOP युरींचे प्रतिपादन; काँग्रेस आमदारांतर्फे राज्यपालांना निवेदन

Yuri Alemao: जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्यावी, असे निवेदन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लोकभवन येथे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची भेट घेत दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्यातील वाढत्या गंभीर प्रश्नांमुळे राज्याची प्रतिमा मलीन होत आहे. राज्यपालांनी संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करावे आणि गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्यावी, असे निवेदन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लोकभवन येथे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची भेट घेत दिले.

आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा उपस्थित होते. या भेटीत काँग्रेस नेत्यांनी राज्यापालांशी प्रशासनातील अपयश, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती, पर्यावरणाची होत असलेली हानी तसेच गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीवर निर्माण झालेले धोके याकडे राज्यपालांचे लक्ष वेधले व इतर अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.

तिसरा जिल्हा

राज्यात तिसरा जिल्हा करण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु त्याची गोव्याला आवश्‍यकता आहे का? तिसरा जिल्हा केल्यास त्याचा आर्थिक भार गोव्यावर किती पडेल ? लोकसंख्येची विभागणी योग्य प्रकारे होईल का ? अशा विषयांचा अहवाल आम्ही मागितला होता, परंतु तो पुरविण्यात आला नाही, असे आलेमाव यांनी सांगितले.

‘आरोप करणाऱ्यांची विश्‍वासार्हता तपासा’

दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाने ‘क्रॉस’ मतदान केले, असा आरोप ज्‍यांनी केला आहे, त्‍यांची विश्‍वासार्हता आधी तपासा, असा सल्‍ला बाणावलीचे आमदार वेंझी व्‍हिएगस यांनी दिला.

आम आदमी पार्टीचे धोरण भाजपविरोधी असून या धोरणात कधीही बदल होणार नाही असे ते म्‍हणाले. यापूर्वी भाजपाला कोण जवळ होते, हे सर्वांनी पाहिलेले आहे. आमची भूमिका नेहमीच स्पष्ट आहे, असे व्हिएगस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: हडफडे दुर्घटनाप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 2 बडे अधिकारी निलंबित; दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

PM मोदींचा संदेश घेऊन जयशंकर पोहोचले बांगलादेशला, तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल; खालिदा झियांच्या लेकाला सोपवली चिठ्ठी

वरगाव-पिळगावच्या ऐतिहासिक चामुंडेश्वरीची 2 जानेवारी पासून जत्रा! रंगणार ‘नौकाविहार’; 5 दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Goa Live News: जिल्हा पंचायतींचे सक्षमीकरण स्वागतार्ह; आमदारांनाही अधिक अधिकार मिळावेत: दिव्या राणे

Ponda Accident: भीषण अपघातानंतर मशिनरी पेटवली, कामगारांना मारहाण! दोघांना अटक; 16 जणांविरोधात गुन्‍हा दाखल

SCROLL FOR NEXT