उत्पन्न अरविंद सायनेकर याला गोमन्त बालभूषण पुरस्कार प्रदान करताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सोबत दयानंद चावडीकर व मान्यवर  Dainik Gomantak
गोवा

करीयरला प्रोत्साहन देणारा 'गोमंत बाल भूषण पुरस्कार'

बालभवन गोवा तर्फे गोमन्त बालभूषण पुरस्कार 2020 चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

पणजी: सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये पुरस्कार मिळणे ही करिअरला प्रोत्साहन देणारी घटना असून तीच करिअरची (career) सुरुवातही असते. पुरस्कार आगामी काळामध्ये आणखी जास्त पुरस्कार मिळवण्याची प्रेरणा देतानाच विद्यार्थ्यांना (students) नावलौकिक मिळवून देतात. आणि भवितव्यही घडवतात. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद (Chief Minister Dr. Pramod Sawant) सावंत यांनी आज केले.

बालभवन गोवा तर्फे गोमन्त बालभूषण पुरस्कार 2020 चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बालभवनचे अध्यक्ष रवि धवन आयएएस, बालभवनचे नूतन संचालक दयानंद चावडीकर व खजिनदार प्रेमराज शिरोडकर व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिकीला डिसोजा ,उत्पल अरविंद सायनेकर, सोहम संतोष पागी, प्रीत हेमराज भाटी, आर्यन आत्माराम आरोलकर, रामचंद्र सदाशिव रेडकर व सहर्ष संतोष वायंगणकर या विद्यार्थ्यांना विविध विभागात असामान्य कला दर्शवल्या बद्दल गोमन्तभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांचे जीवन आनंदमय घडवण्याचे काम बालभवनाद्वारे होत आहे . क्रिएटिव्ह इनोवेशन विषय बालभवन मध्ये सुरू केल्यामुळे मुलांना वेगळे विषय शिकण्याची संधी मिळत आहे .गोवा विज्ञान केंद्रामध्ये विविध वैज्ञानिक विषयावरील प्रदर्शने आणि इतर उपक्रम सुरू आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. बालभवन मधील शिक्षक चांगले काम करत असून शाळांत पूर्ण वेळ कला विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी बालभवन प्रमाणे जास्तीत जास्त कलाकार घडववण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले .

आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकार शक्य ते सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगून बालभवन इंस्ट्रक्चर म्हणून काम करणाऱ्यांच्या विविध मागण्यावर सरकार नक्कीच विचार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले .दयानंद चावडीकर यांनी स्वागत केले, तर शशिकांत पुनाजी यांनी आभार व्यक्त केले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

BMW i5 LWB ची भारतात ग्रँड एन्ट्री! एका चार्जमध्ये 669 किमी धावणार, 268 bhp पॉवर अन् लक्झरी फीचर्स मिळणार; किंमत किती? पाहा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT