कोकणी वाचन विश्व उपक्रम (Goa) Daink Gomantak
गोवा

Goa: कोकणी वाचन विश्व उपक्रमाच्या वर्षपुर्ती निमित्त 8 रोजी खास कार्यक्रम

उपक्रमाला दिवसें दिवस वाढता प्रतिसाद (Goa)

मंगेश बोरकर

Goa: ८ सप्टेंबर या दिवशी कोकणी वाचन (Konakani Language) विश्व उपक्रमाच्या वर्षपुर्ती निमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या दिवशी संध्याकाळी 6 ते 7.30 दरम्यान ऑनलाईन कार्यक्रमात (Online Program) पुणे (Pune) येथील 'बुक्स दॅट स्पीक'च्या (Books That Speak) संस्थापिका आसावरी दोशी प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित राहतील. ज्येष्ठ लेखक व प्रोफेसर  डॉ. प्रकाश वजरीकर हे प्रमुख वक्ते असतील.

कोरोना महामारिने (Corona Epidemic) जागतिक स्तरावर गंभीर परिणाम केले असताना कोकणीच्या कार्यकर्त्यांनी कोकणी भाषा मंडळाच्या माध्यमातुन डिजिटल व्यासपिठाचा (Digital platform) सर्वोत्तम फायदा करुन घेताना 'कोकणी वाचन विश्व' हा उपक्रम सुरु केला. 8 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (International Literacy Day) म्हणुन साजरा केला जातो. त्या दिवसाचे महत्व नजरेसमोर ठेवुनच हा उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमाद्वारे मंडळाने युवकांना व खास करुन नवोदीत लेखकांना संधी उपलब्ध करुन देण्यास महत्वपुर्ण योगदान दिले. या उपक्रमा अंतर्गत साहित्यिक चर्चा, लेखकांच्या मुलाखती, पुस्तकांचे परिक्षण असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

या कार्यक्रमातुन युवकांना वाचनाची आवड निर्माण करण्यात व त्यांना स्वतःचे साहित्यिक विचार व मते व्यक्त करण्याची संधी प्राप्त होत आहे. हे सर्व कार्यक्रम मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ, स्नेहा सबनिस, पलाश अग्नी तसेच इतर अनेक युवकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जाणार. कोकणी वाचन विश्व उपक्रमाद्वारे लेखक, कवी, अभ्यासक, समिक्षक व विचारवंत घडविण्याचे कार्य हा प्रमुख उद्देश आहे. 

सुरुवातीला गुगल मीटद्वारे 300 लोक या उपक्रमाशी जोडले गेले पण सद्या 800 पेक्षा जास्त लोकांचा प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला आहे. कोकणी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, शिक्षक, विद्यार्थी  यांचा या उपक्रमाला दिवसे दिवस मिळत असलेला वाढत्या प्रतिसादामुळे या उपक्रमाची बुनियाद अधिकाधिक मजबुत होत चालली आहे, असे कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT