Tragic Death Dainik Gomantak
गोवा

Delivery Death Case: प्रसूतीदरम्यान 41 वर्षीय महिलेचा मृत्यू, निष्काळजीपणाचा ठपका; डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Woman death during delivery Goa: महिला पाळी-कोठंबी येथील रहिवासी होती. या महिलेच्या मृत्यूनंतर म्हापसा पोलिसांनी या घटनेची नोंद अनैसर्गिक मृत्यू, अशी केली होती.

Sameer Panditrao

म्हापसा: डिसेंबर २०२३ मध्ये प्रसूतीदरम्यान ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू संबंधित खासगी इस्पितळातील डॉक्टरांचा बेजबाबदारपणा व निष्काळजीपणामुळे झाल्याचा ठपका ‘गोमेकॉ’च्या रिड्रेसल कमिटीने अहवालात ठेवला आहे.

त्यानुसार पोलिसांनी नामांकित खासगी इस्पितळातील डॉक्टर दाम्पत्य अजित मोपकर आणि प्रीतम मोपकर यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. ही घटना २ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडली. ४१ वर्षीय महिलेला प्रसूतीसाठी या खासगी इस्पितळात भरती केले होते.

ही महिला पाळी-कोठंबी येथील रहिवासी होती. या महिलेच्या मृत्यूनंतर म्हापसा पोलिसांनी या घटनेची नोंद अनैसर्गिक मृत्यू, अशी केली होती.

मात्र, गोमेकॉतील रिड्रेसल कमिटीने या प्रकरणाचा तपास करून अहवाल दिला की, या महिलेच्या प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने महिलेचा मृत्यू झाला. या अहवालानुसार पोलिसांनी या डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा नोंद केला आहे. म्हापसा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

जुळ्या मुलांचाही अंत

या महिलेला प्रसूतीसाठी या खासगी इस्पितळात भरती केले असता, तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र, या प्रसूतीदरम्यान तिची व्यवस्थित काळजी घेण्यात आली नाही. परिणामी वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाल्याने महिलेला गोमेकॉत हलविले असता, तिचा उपचारावेळी निधन झाले. कालांतराने जुळ्या मुलांचाही मृत्यू झाला होता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT