Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: मान्सूनमध्ये अनुभवा गोव्याचे जादुई सौंदर्य! पर्यटन विभागाची ‘ग्लो ऑन अरायव्हल’ मोहीम; 4 महिने वेगवेगळ्या थीम्स

Goa Monsoon Tourism: गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने २०२५ च्या मान्सूनसाठी विशेषरित्या तयार केलेली ‘ग्लो ऑन अरायव्हल’ ही आकर्षक मोहीम सुरू केली आहे. ‘

Sameer Panditrao

पणजी: गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने २०२५ च्या मान्सूनसाठी विशेषरित्या तयार केलेली ‘ग्लो ऑन अरायव्हल’ ही आकर्षक मोहीम सुरू केली आहे. ‘मान्सून म्हणजे गोवा’ या संकल्पनेवर आधारीत ही मोहीम पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने गोव्याच्या अद्वितीय आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

पर्यटन संचालक केदार नाईक यांनी या मोहिमेच्या उद्देशाचे वर्णन करताना सांगितले, की ‘ग्लो ऑन अरायव्हल’ म्हणजे गोव्यातील सर्वात जादुई ऋतू आहे. गोवा फक्त समुद्रकिनाऱ्यांसाठी नव्हे, तर तो निसर्गाशी संवाद, सांस्कृतिक आणि वैयक्तिक स्वास्थ्यासाठी उत्तम ठिकाण आहे. हा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी आवर्जून गोव्याला भेट द्यावी.

ही मोहीम डिजिटल माध्यमांवर, सोशल मीडिया, ट्रॅव्हल नेटवर्क व पर्यटन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे. यामुळे जागतिक स्तरावर गोव्यातील पर्यटनाला नवी ओळख मिळेल. या मोहिमेच्या माध्यमातून गोवा ‘रिफ्रेशमेंट डेस्टिनेशन’ म्हणून प्रस्थापित होत आहे.

चार महिने, चार वेगळ्या थीम्स

जून – गोव्यातील उत्सवांचे दर्शन : सांजाव, चिखल कालो यांसारख्या पारंपरिक, स्थानिक सणांवर भर देण्यात येईल.

जुलै – खाद्यसंस्कृतीचा स्वाद : पावसाळ्यात विशेषतः बनवल्या जाणाऱ्या पाककृती, पारंपरिक गोडधोड पदार्थाचे सादरीकरण.

ऑगस्ट – साहसी अनुभव : मान्सून ट्रॅक, वृक्षारोपण, साहसी क्रियाकलाप यांमुळे पर्यावरण-स्नेही पर्यटनाला चालना.

सप्टेंबर – गोव्यातील वैविध्याचा उत्सव : जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधून किल्ले, धबधबे, संग्रहालये आणि विविध ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळांवर प्रकाश.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT