GI Tag For Goa's Mankurad Mango, Bebinka Dainik Gomantak
गोवा

GI Tag For Goan Product: गोव्यातील मानकुराद, बिबिंका, वांगी, भेंडीला ‘जीआय’ मानांकन

जीआय मिळालेल्या वस्तूंचे उत्पादन वाढवणे, चांगल्या प्रतीचा माल बनवणे, खाद्यपदार्थांची गुणवत्ता राखणे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

GI Tag For Goan Product आपल्या गुण वैशिष्ट्यामुळे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या बिबिंका, मानकुराद, आगशीची वांगी आणि सातशिरो भेंडी या राज्यातील चार वस्तूंना जीआय (जिओग्राफिकल आयडेंटिटी) मानांकन मिळाले आहे.

यापूर्वी चार वस्तूंना हे मानांकन मिळाले आहे, अशी माहिती विज्ञान-तंत्रज्ञान मंडळाच्या जीआय विभागाचे नोडल अधिकारी दीपक परब यांनी दिली आहे.

परब म्हणाले, यापूर्वी राज्यातील खाेला मिरची, हरमल मिरची, काजू फेणी, मायंडोळी केळी आणि गोवन खाजे या पाच वस्तूंना जीआय मानांकन मिळाले आहे. जीआय मानांकन मिळावे म्हणून आम्ही या वस्तूंची बिबिंका, मानकुराद, आगशीची वांगी, काजूगर आणि सातशिरो भेंडी या वस्तूंची संशोधनात्मक अहवालासह नोंदणी केली होती.

जीआय निबंधकांकडून हा अहवाल हरकतींसाठी 120 दिवस खुला ठेवण्यात आला होता. यापैकी काजूगर वगळता इतर चार वस्तूंना कोणीही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे या चार वस्तूंना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे.

जीआय यासाठी महत्त्वाचे

स्थानिक वैशिष्ट्यांसह आगळ्यावेगळ्या गुणधर्म असणाऱ्या वस्तूंना जीआय मानांकन दिले जाते. यामुळे स्थानिक बाबींची प्रदेशनिष्ठता जोपासली जातेच, याशिवाय त्यांची विक्री त्यांचे प्रमोशन करण्याला फायदा होतो. या वस्तूंचे नेमके स्थान निश्चित होते. अशा वस्तूंमध्ये भेसळ अथवा अन्य बाबी झाल्यास त्यावर न्यायालयीन लढाई लढता येते आणि आपले स्वामित्वही कायम राहते.

जीआय मिळालेल्या वस्तूंचे उत्पादन वाढवणे, चांगल्या प्रतीचा माल बनवणे, खाद्यपदार्थांची गुणवत्ता राखणे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. याकरता संबंधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी खात्याने पुढाकार घेतल्यास शेतकरी आणि उत्पादकांना अधिकचा आर्थिक लाभ मिळेल.

- दीपक परब, जीआय नोडल अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT