Goa government jobs Dainik Gomantak
गोवा

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

GDS recruitment Konkani language: टपाल विभागाने गोवा राज्यासाठी असलेल्या GDS भरतीच्या नियमांमध्ये सुधारणांना मंजुरी दिली आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील ग्रामिण डाक सेवक भरती प्रक्रियेत मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (दि.८) घोषणा केली की, टपाल विभागाने गोवा राज्यासाठी असलेल्या GDS भरतीच्या नियमांमध्ये सुधारणांना मंजुरी दिली आहे. या नवीन धोरणानुसार, अर्जदारांसाठी कोकणी भाषेतील प्राविण्य अनिवार्य करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रमेश पाटील, संचालक, टपाल सेवा, गोवा विभाग यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. पाटील यांनीच GDS भरती नियमांमध्ये केलेल्या बदलांना मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोकणी आणि मराठी या दोन्ही भाषांना GDS पदांच्या भरतीसाठी स्थानिक भाषा म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे.

शैक्षणिक पात्रता

नवीन नियमांनुसार, ज्या उमेदवारांनी दहावीपर्यंत कोकणी किंवा मराठी यापैकी कोणतीही भाषा अभ्यासली असेल, ते अर्ज करण्यास पात्र असतील. तसेच, या नियमांतील सर्वात महत्त्वाचा बदल हा आहे की, ज्या उमेदवारांना मराठीमध्ये प्राविण्य आहे, त्यांनाही कोकणी भाषेतील प्राविण्य सिद्ध करणे अनिवार्य असेल. याचा अर्थ गोव्यातील GDS पदांसाठी आता कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकच आहे.

स्थानिक युवकांना प्राधान्य आणि सेवा बळकट करणे

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, या महत्त्वपूर्ण सुधारणेमुळे टपाल खात्यातील भरती प्रक्रियेत गोमंतकीय तरुणांना प्राधान्य मिळेल. तसेच, स्थानिक युवकांसाठी अधिक रोजगार संधी निर्माण होतील. स्थानिक भाषा अनिवार्य केल्यामुळे टपाल सेवा वितरण अधिक प्रभावी होईल आणि गोव्यातील ग्रामीण भागातील नागरिकांशी संपर्क साधणे सुलभ होईल, ज्यामुळे गोव्यातील टपाल सेवा वितरण अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Zoho Mail: Gmail, Yahoo विसरा आता देशी ई-मेल वापरा; झोहोवर वैयक्तिक आणि बिझनेस मेल कसा तयार कराल? Step By Step प्रोसेस

Viral Video: 'एक्सप्रेस'वे वर थरार! नव्या कारच्या सेलिब्रेशनचा जीवघेणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT