illegal Construction Dainik Gomantak
गोवा

illegal Construction: उपजिल्हाधिकाऱ्याच्या घराला 'जीसीझेडएमए'ने बजावली नोटीस, आवश्यक परवाने नसताना बांधकाम

Goa illegal construction: गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए) साल्वादोर-द-मुंद येथे एका उपजिल्हाधिकाऱ्याने बांधलेल्या घराला ''कारणे दाखवा'' नोटीस बजावली आहे.

Sameer Amunekar

पणजी : राज्यात किनारपट्टी नियमन क्षेत्रातील (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन केल्याने गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए) साल्वादोर-द-मुंद येथे एका उपजिल्हाधिकाऱ्याने बांधलेल्या घराला ''कारणे दाखवा'' नोटीस बजावली आहे.

बेकायदा बांधकाम केल्याची तक्रार रितेश हळर्णकर यांनी १४ जुलै २०२५ रोजी केली होती. या तक्रारीची दखल घेत प्राधिकरणाने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

पाहणीत संबंधित जागेत तळमजला अधिक दोन मजले आरसीसी संरचना उभी असल्याचे आढळून आले आहे. तसेच भूमी अभिलेख विभागाच्या (डीएसएलआर) अधिकृत संकेतस्थळावर या सर्व्हे क्रमांकात कोणत्याही बांधकामाच्या प्लिंटची नोंद नाही.

ही जमीन ''सीआरझेड-३'' (नदी/खाडी नो-डेव्हलपमेंट झोन) अंतर्गत येते. नियमानुसार, १९९१ पूर्वीच्या जुन्या वास्तूच्या दुरुस्तीशिवाय येथे नवीन बांधकामाला परवानगी नाही. पाहणीदरम्यान संबंधित व्यक्तींनी बांधकामासाठी आवश्यक असलेले कोणतेही ना-हरकत प्रमाणपत्र किंवा परवाना सादर केला नाही.

बांधकाम थांबवण्याचे आदेश

हे बांधकाम पाडून जमीन मूळ स्थितीत का आणली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण संबंधितांनी द्यावे, असे प्राधिकरणाने बजावलेल्या कारणेदाखवा नोटीसित स्पष्ट केले आहे. तसेच, तातडीने सर्व प्रकारचे बांधकाम थांबवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

जर संबंधित व्यक्ती समाधानकारक कागदपत्रे सादर करू शकल्या नाहीत, तर बांधकाम पाडण्यासह पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले जातील, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Casino Traffic Congestion: पणजीतील कॅसिनो परिसरात आता 'नो पार्किंग'; उच्च न्यायालयाचे कडक निर्देश, नियम मोडल्यास कारवाई!

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

SCROLL FOR NEXT