Goa Latest Political News Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; सारेच ‘गॅस’वर

Goa Latest Political News: सध्या गॅस सिलींडर मिळत नाहीत, अशी माहिती राज्यभरात पसरल्याने लोकांत घबराट आहे. त्यामुळे रिकामे सिलींडर घेऊन गॅस एजन्सीच्या ठिकाणी धाव घेणे अनेकांनी सुरू केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सारेच ‘गॅस’वर

सध्या गॅस सिलींडर मिळत नाहीत, अशी माहिती राज्यभरात पसरल्याने लोकांत घबराट आहे. त्यामुळे रिकामे सिलींडर घेऊन गॅस एजन्सीच्या ठिकाणी धाव घेणे अनेकांनी सुरू केले आहे. कुंकळ्ळीत सिलींडरने भरलेले वाहनही लोकांनी अडवून सिलींडरची मागणी केली होती. खरेतर गॅस सिलींडरचे बुकींग करणे आणि तो सिलींडर घरपोच मिळण्‍याची एक प्रक्रीया आहे. ती करणे आवश्यक असताना गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर रांगा लावून काय साध्य होते, ते रांगा लावणाऱ्यांनाच ठाऊक असावे. मात्र याविषयावरून सरकारी पातळीवर सारी यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र मात्र तयार झाले आहे. ∙∙∙

कुडचडेतील सेक्‍स स्‍कँडल

सध्‍या कुडचडे भागातील एका लोकप्रतिनिधीच्‍या मुलाचे कारनामे गाजत असून काही राजकारण्‍यांचा आशीर्वाद असल्‍यामुळे त्‍याच्‍या या कारनाम्‍यांवर पांघरुण घातले जातेय. वास्‍तविक हे कारनामे साधेसुधे नसून चक्‍क लैंगिक अत्‍याचाराशी निगडीत आहेत. यातील काही मुली अल्‍पवयीन असून त्‍यांच्‍या अडचणींचा फायदा उठवून त्‍यांना ब्‍लॅकमेल करून त्‍यांची पिळवणूक या लाेकप्रतिनिधीच्‍या पुत्राकडून केली जात आहे. सध्‍या कुडचडे भागात हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र अजूनही कुणी याबाबत तक्रार केलेली नाही. असे कारण पुढे करून पोलिसही याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याच्‍या कारनाम्‍यांना आळा कोण घालणार?, पीडितांचे नातेवाईक हाच प्रश्‍न करू लागलेत. ∙∙∙

अंधाराचे जाळे

पणजीचे आंतरराज्य खासगी बससाठीचे बसस्थानक सध्या अंधारात बुडाले आहे. तेथे बस पकडण्यासाठी जाणाऱ्यांना अंधारात चाचपडतच जावे लागत आहे. शेजारी असलेले कदंब बसस्थानक दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघत असतानाच हे बसस्थानक मात्र अंधाराचे जाळे कधी फिटेल याची वाट पाहत आहे. येथे दिवे बंद, पण ‘सक्रियता’ मात्र तेजीत! प्रवासी अंधारात चाचपडत, तर संशयास्पद हालचालींना मोकळे रान. सुरक्षिततेची जबाबदारी कुणाचीहा प्रश्नही बहुधा अंधारातच हरवला. प्रशासनाची नजर चुकते की जाणीवपूर्वक वळते, हे कळेना. बसस्थानकाचे रूपांतर प्रवासी केंद्रापेक्षा सावल्यांच्या रंगमंचात; आणि अधिकारी अजूनही ‘प्रकाश’ येण्याची वाटच पाहतायत! ∙∙∙

दिगंबरपंतांचा आशीर्वाद

कॉंग्रेसचे केपेतील आमदार एन्टन डीकॉस्टा व विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी बाळ्ळी -केपे रस्त्याच्या हॅाटमिक्सींग शुभारंभावेळी ज्या मुक्त कंठे दिगंबर कामत यांची स्तुती केली व त्यांच्यामुळेंच आपण आमदार झालो, असे जे म्हटले. त्यामुळे अनेकांच्या ,विशेषतः कॉंग्रेसमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसे दिगंबरपंत हे कोणाशी विनाकारण पंगा घेणाऱ्यांपैकी नाहीत हे जरे खरे असले तरी त्यांनी ज्या पध्दतीने आठजणांसमवेत भाजपात जाऊन कॅांग्रेसला ऐन वेळी तोंडघशी पाडले त्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर डूख धरलेला आहे. अशा स्थितींत कॉंग्रेस आमदारांनी ज्या प्रकारे त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत त्यामुळे पंचांची छाती दोन इंचांनी तरी खचितच फुगणार आहे. तसे पाहिले मुख्यमंत्री झाल्यावर कामत यांचा मडगावांत जाहीर सत्कार घडवून आणणारे आज त्यांना पाण्यात पहातात अशावेळी कॉंग्रेस आमदार स्तुती करतात हेच पंचांचे वेगळेपण असल्याचे त्यांचे समर्थक म्हणतात. ∙∙∙

दिगंबर यांची नवी सुरुवात

सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी गुढी पाडव्याला सकाळी घरी कडुलिंबाची पाने खाऊन थेट केपे गाठले. काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्तांच्या या मतदारसंघात जाऊन बाळ्ळी येथे रस्त्याच्या हॉटमिक्सिंगच्या कामाचा नारळ फोडला व पेढा खाऊन तोंड गोड केले. यावेळी केलेल्या भाषणात दिगंबर कामतांनी आज नवीन वर्षाच्या सुरूवातीला मागची कटूता सोडून नवी सुरूवात करूया, असा उपदेश एल्टन व तेथे खास उपस्थित असलेले कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांना दिला. त्याला प्रतिसाद देताना कामत यांच्या आशीर्वादानेच आम्ही आमदार बनलो, त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाहीत, असे युरी-एल्टन जोडीने जाहीरपणे सांगितले. आम्ही एक चांगली व्यक्ती म्हणून दिगंबर कामतांबरोबर राहू, असे एल्टन बोलले. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच एखाद्या कामाचा शुभारंभ विरोधी आमदारांच्या मतदारसंघात करणे, ही राजकारण कोळून प्यायलेल्या दिगंबर कामतांची कॉंग्रेसच्या दोन आमदारांना बरोबर घेऊन ‘नवी सुरूवात’ तर नाही ना? अशी चर्चा आता पणजीतल्या कॉंग्रेसभवनात सुरू झाली आहे. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचे आरोग्यपुराण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुण्याच्या दौऱ्यावर असताना तेथील एका इस्पितळात तपासणीसाठी गेले. इस्पितळाकडून ॲंजिओप्लास्टी झाल्याची अधिकृत माहिती जारी करण्यात आली. त्याआधारे तीन दैनिकांनी बातम्या दिल्या. त्या प्रकाशित होताच एकच गोंधळ उडाला. त्यातच मुख्यमंत्री कार्यालयातून तसे काही घडले नसल्याचे सांगण्यात आले. दुपारी इस्पितळाचे प्रमुख आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ जारी करत आरोग्यावरील संभ्रमाचे ढग दूर करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे आरोग्य हा त्यांचा खासगी विषय आहे, हे समजून वर्तमानपत्रांनीही हा विषय फारसा ताणला नाही आणि दिवसभर सुरू असलेल्या आरोग्यपुराणावर सायंकाळी कसाबसा पडदा पडला. त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ॲंजिओप्लास्टी झाल्याचे सांगत थोडासा संभ्रम मात्र निर्माण केला होता. ∙∙∙

हजारे तयारीत...

मडगाव पालिकेची निवडणूक आता लवकरच होणार आहे. अजूनही निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी अनेकांनी आपली तयारी सुरू केली आहे. यात माजी नगरसेवक रामदास हजारे यांचाही समावेश आहे. ते प्रभाग दहा मधून उभे राहू पाहत आहेत. हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला तर मात्र अन्य प्रभागातूनही त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली आहे. फॉरवर्ड वाल्यांशी ते संधान बांधून आहेत. दामू नाईक हेही त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत बरं का!. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT