Goa: डिचोलीत अल्पवयीन मुलीवर "गँगरेप" Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोलीत अल्पवयीन मुलीवर "गँगरेप"? परशुराम सेनेच्या आरोपानंतर खळबळ

डिचोलीत (Bicholim) घडलेले हे बलात्कार प्रकरण म्हणजे अत्यंत नीच कृत्य आणि गोव्याच्या (Goa) प्रतिमेला काळीमा फासणारी घटना आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: आठ दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या डिचोली (Bicholim) येथील अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार प्रकरणात किमान दहाजण गुंतले असल्याचा संशय व्यक्त होत असून, तशी चर्चाही डिचोलीत चालू आहे. दरम्यान. पिडीत मुलीवर बलात्कार प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली असली, तरी दुर्दैवी मुलीवर एका विशिष्ट पंथातील किमान दहाजणांनी बलात्कार केल्याचा आरोप 'श्री परशुराम गोमंतक सेने'चे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी डिचोलीत केला आहे. तसा व्हिडीओही समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे डिचोलीत खळबळ माजली असून, सर्वत्र तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना अटक करा. अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

प्रकरण राष्ट्रीय पातळीवर नेणार

डिचोलीत घडलेले हे बलात्कार प्रकरण म्हणजे अत्यंत नीच कृत्य आणि गोव्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना आहे. असे शैलेंद्र वेलिंगकर यांनी म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास, हिंदू संघटना गप्प बसणार नाहीत. वेळप्रसंगी हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर नेण्यात येईल. असा इशाराही श्री. वेलिंगकर यांनी व्हिडिओतून दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाची योग्य दिशेने चौकशी करून गुन्हेगारांना अटक करावी. या मागणीसाठी विविध हिंदू संघटनांच्या प्रतिनिधीनी आज (ता.5) सायंकाळी 4 वा. डिचोली पोलिस स्थानकावर जमावे.असे आवाहन शैलेंद्र वेलिंगकर यांनी केले आहे. स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे. अशी मागणीही श्री. वेलिंगकर यांनी केली आहे.

अन प्रकरण उजेडात

डिचोलीतील एका पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असून, ती मुलगी गरोदर राहिल्याने हे प्रकरण उजेडात आले आहे. आठ दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल होताच, डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून, एका संशयित युवकाला अटक केली आहे. पिडीत मुलगी सध्या एका बिगर सरकारी संघटनेच्या देखरेखीखाली असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT