Goa Ganeshotsav 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या माटोळीसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठा हाऊसफुल्ल !

Kavya Powar

काव्या पोवार

गणेशोत्सव हा सण संपूर्ण देशभरामध्ये अगदी जल्लोषात साजरा करण्यात येत असला तरी गोव्यामध्ये त्याची परंपरा अनोखी आणि धार्मिकतेला जोडणारी आहे. इतर ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो; मात्र गोव्यामध्ये घरगुती गणेशोत्सवाला अधिक महत्त्व आहे.

सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू असताना राज्यभरातील बाजारपेठा गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनी, रंगीबेरंगी सजावटीच्या वस्तूंनी सजल्या आहेत. गोव्याच्या मध्यवर्ती असलेल्या पणजी मार्केटमध्ये विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, सजावटीचे साहित्य तसेच गणपतीची आरास करण्यासाठी लागणारा इतर वस्तूंनी आणि माटोळीसाठी लागणाऱ्या साहित्याने भरल्या आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर आता पुन्हा एकदा आधीसारखा गणेशोत्सव साजरा करण्याची संधी गणेशभक्तांना मिळाली आहे.

इतर सणांच्या तुलनेत व्यापारी वर्गही गणेशोत्सवामध्ये अतिशय उत्साही दिसत आहेत. पूजेसाठी लागणारे साहित्य, सजावटीसाठी लागणारे साहित्य, गोडधोड पदार्थ आणि सणाच्या कालावधीदरम्यान लागणाऱ्या सर्व गोष्टी पणजी मार्केटबरोबरच इतर बाजारपेठांमध्येही उपलब्ध आहेत. व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे यंदा त्यांना ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार..!

आपले राज्य क्षेत्रफळाने जरी लहान असले तरी परंपरेने आणि इथल्या धार्मिकतेने मात्र विशाल आहे. दोन वर्षांपासून मावळलेला उत्साह पुन्हा एकदा गणेशोत्सवानिमित्त फुलून यावा यासाठी सरकारने संपूर्ण राज्यभरामध्ये तालुकास्तरावर “स्वयंपूर्ण चतुर्थी बाजारा”चे आयोजन केले. या बाजारामार्फत स्थानिक कामगारांना रोजगार देखील उपलब्ध झाला. चतुर्थी बाजारामध्ये गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य, पाककलेचे पदार्थ त्याचबरोबर इतर गोष्टीदेखील उपलब्ध आहेत. बाजारातील व्यापाऱ्यांनी सरकारच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

माटोळीच्या वस्तूंनी बाजारपेठा “हाऊसफुल्ल”

गोवा आणि कोकण भागामध्ये गणेशोत्सव माटोळीशिवाय अपूर्णच. माटोळीआणि बाप्पाचे नातेअनेक वर्षांपासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गणपतीच्या आदल्या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये घरोघरी माटोळी बांधण्याचे काम सुरू होते. खरेतर श्रावण महिन्यामध्ये निसर्ग नव्याने फुलून आलेला असतो. यामध्ये पीके उभारी घेत असून निसर्गामध्ये जी फुले-फळे आपल्याला दिसून येतात.

हीच रानफुले, फळे, विविध वनस्पती माटोळीमध्ये बांधली जातात. जवळजवळ 300 ते 400 हून अधिक वनस्पतींचा आणि फळा-फुलांचा समावेश माटोळीमध्ये केला जातो. मडगाव, पणजीआणि बाणास्तरीमध्येभरलेल्या बाजारासह इतर बाजारांमध्येही माटोळीसाठीचे सर्व साहित्य इथे उपलब्ध आहे.यामध्ये आंबाडे, आंब्या-ताळो, ईडलिंबू, कांगल्यो, कुड्डूक, घागऱ्यो, चिबुड, तवशें, माट्टा, आसाळे, नागुलकुडो असे विविध साहित्य विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे. त्यामुळे हळूहळू पुन्हा एकदा बाजारपेठा गजबजल्या असून आपल्या लाडक्या बाप्पासाठी सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील करासवाडा येथील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

Professional League 2024: स्पोर्टिंग क्लबचा एफसी गोवाला धक्का! स्पर्धेतील सलग तिसरा विजय

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

SCROLL FOR NEXT