Goa Ganesh Festival 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Festival : सात मंडळे, कोट्यवधींची उलाढाल

दैनिक गोमन्तक

उत्तर गोव्याची प्रति राजधानी असलेल्या म्हापसा शहराला धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा वरदान लाभला आहे. गोवा मुक्तीनंतर, पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हापसा शहरातच सुरू झाला. आज, 61 वर्षांच्या कालखंडानंतर सात सार्वजनिक गणेशोत्सव या ठिकाणी साजरे केले जातात. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. या मंडळांचे सामाजिक कार्यात अधिक योगदान राहावे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्‍यक्‍त होत आहे.

1962 मध्ये, पहिला सार्वजनिक गणेशोत्सव लोहिया उद्यानात, माजी आमदार रघुनाथ अनंत टोपले व मंडळींनी सुरू केला. लोकमान्य टिळकांचे विचार पुढे नेण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवाची सुरुवात झाली. पोर्तुगिजाच्या जुलमी राजवटीच्या छत्राखाली गोमंतकीयांची जडणघडण झाली होती. त्या काळात सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्य चालू होते. मात्र, मुक्तीनंतर, समाज प्रबोधन करणाच्या दृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली.

म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला 61वा, गणेशोत्सव साजरा करीत आहे. तर खोर्ली, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपला 50वा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव साजरा करणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात जनतेला हवी होती साथ!

अपवाद वगळता म्हापसा शहरातील गणेशोत्सव मंडळांनी कोरोना महामारीच्या काळात सामाजिक कार्य केले नाही. गरीब जनतेला हात देण्यासाठी पुढे न आल्यामुळे शहरातील नागरिक या मंडळांवर काहीसे नाराज झाले. समाजाकडून पैसा गोळा करून फक्त कायम ठेवी किंवा जमिनी व देवाला सोन्याचे दागिने बनविण्यास कमिटी मंडळ मग्न झाले.

मात्र, गरजवंतांना कोरोना महामारीच्या काळात कडधान्य, मास्क, औषध, ऑक्सिजन सिलिंडर, रुग्णवाहिका उपलब्ध करण्यास पुढे आले नाहीत. फक्त गणेशोत्सवाच्या वेळी दारोदारी फिरून सामान्य जनतेकडून वर्गणी गोळा करण्याचे काम करतात. मात्र, प्रत्यक्ष जनता कोरोना महामारीमुळे त्रस्त झाली, तेव्हा कुठलीच मंडळे जनतेच्या दुखात सहभागी होण्यास पुढे सरसावली नाहीत, असा अनेक जण अनुभव सांगत आहेत.

उप्रकम असे

म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करते. तसेच दरवर्षी गणेशोत्सवानंतर रक्तदान शिबिर, बालनाट्य शिबिरांचे आयोजन होते. इतर मंडळाचे कार्यक्रम गणेशोत्सवाच्या वेळीच होतात, वर्षभर होत नाहीत.

गणेश मंडळांचे भरीव मदतकार्य

म्हापसा गणेशोत्सव विश्वस्त मंडळाने शिल्लक राहिलेल्या रक्कमेतून तीन गोदाम, सोन्याचा मुकुट, चांदीचे मखर, प्रभावळ, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भव्य लोखंडी मंडप, गावसावाडा येथे 4200 चौरस मीटर जागा खरेदी करून, 17 कोटी रुपयांचे सिद्धीविनायक भवन बांधण्यास प्रारंभ केला आहे. म्हापसा शहरातील 17 शाळा आणि हायस्कूलमधील 340 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औषधांसाठी आर्थिक मदत, अंत्यसंस्कारासाठी मदत दिली जाते.

कोरोनामुळे मंडळाच्या उत्पन्नात कपात झाली आहे. 45 लाखाच्या उत्पन्नावरुन 25 लाखावर आले आहे. खोर्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देवस्थान चालवित आहे. अन्साभाट गणेशोत्सव मंडळ दरवर्षी 50 हजार रुपयांचे सामाजिक कार्य करते. कविशैला कन्नड संघाला वर्गणी कमी येत असल्यामुळे सामाजिक कार्य करता येत नाही.

म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सवाच्या वेळी दर्जेदार कार्यक्रम आणून सांस्कृतिक मेजवानी दिली जाते. रक्तदान शिबिर, बालनाट्य शिबिरांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सव मंडळ गावसावाडा येथे सिद्धिविनायक भवन बांधत आहे. या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे सामाजिक कार्य पुढे नेता येत नाही, ही खंत आहे. यंदा 61वा गणेशोत्सव असून सुद्धा साधेपणाने साजरा करणार आहोत.

- अवधूत स. शेट नार्वेकर, विश्वस्त अध्यक्ष, म्हापसा गणेशोत्सव.

अन्साभाट सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाचे 4 लाख रुपयांचे उत्पन्न असते, खर्च 3.50 लाख रुपये जातो. शिल्लक रक्कम आम्ही आरोग्य व शिक्षणासाठी वापरतो. गरजू नागरिकांच्या आम्ही मदतीचा हात बनतो.

- प्रदीप शेट्ये, अध्यक्ष अन्साभाट सांस्कृतिक गणेशोत्सव.

खोर्ली सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव सुवर्ण महोत्सवी असल्यामुळे थाटामाटात साजरा होईल. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसाद असणार आहेत. यंदा गणेश मंदिराचा जीर्णोद्वार केला जात आहे.

- मिलिंद अणवेकर, खोर्ली गणेशोत्सव मंडळ सचिव.

कविशैला कन्नड संघ म्हापसा, मागील नऊ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव चालू करून बाप्पाची सेवा हा मुळ उद्दिष्ट आहे. आमच्या संघाची नोंदणी सोसायटी कायदाअंतर्गत असल्यामुळे राज्य सरकारने आमच्या सारख्या मंडळांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे.

- शंभू शेट्टार, अध्यक्ष, कविशैला कन्नड संघ म्हापसा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT