Deputy Chief Minister Babu Azgawkar Dainik Gomantak
गोवा

Goa: इंधन प्रकल्पामुळे प्लास्टिक समस्येला लागणार ब्रेक- उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgawkar) यांनी बोलताना या प्रकल्पाला आपला पूर्ण पाठींबा आहे , प्लास्टिक पासून इंधन तयार करणे हि प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पेडणे पालिका (Pernem) क्षेत्रात देशातील दुसरा इंधन प्रकल्प येत्या काही दिवसात कार्यरत होणार आहे आणि हा प्रकल्प कार्यरत झाल्यानंतर राज्यातील प्लास्टिक समस्या (Plastic Problem) कायम स्वरूपी सुटणार आहे. या प्रकल्पातून पेडणे पालिकेला कंपनींच्या उत्पन्नातून 1 टक्का मिळेल अशी माहिती उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgawkar) यांनी 8 रोजी इंधन प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्यांनी दिली.

यावेळी मुख्याधिकारी अक्षया आमोणकर ,नगराध्यक्ष उषा नागवेकर , उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर , नगरसेवक विष्णू उर्फ बाप्पा साळगावकर , नगरसेवक शिवराम तुकोजी ,प्रकाश कांबळी , माजी सरपंच उल्हास देसाई , विश्वनाथ तिरोडकर नगरसेविका राखी कलशावकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना या प्रकल्पाला आपला पूर्ण पाठींबा आहे , प्लास्टिक पासून इंधन तयार करणे हि प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे दरदिवशी आवश्यक असलेले टाकावू प्लास्टिक या प्रकल्पात आणावे असे आवाहन करून .या प्रकल्पामुळे किमान 70 रोजगार पालिका क्षेत्रातील युवकाना मिळणार आहे. पालिकेने चांगला प्रकल्प आणला मागच्या चार पाच वर्षापूर्वी काही कारणामुळे तो बंद होता . एकूण 17 कोटी या प्रकल्पावर इन्वेस्ट करून उभारला. या प्रकल्पामुळे राज्यातील प्लास्टिक कचऱ्याची समस्या संपणार आहे. त्याच बरोबर मिळणाऱ्या इंधनाच्या उत्पानातुन एक टक्का सरकारला व एक टक्का पेडणे नगरपालिकेला रक्कम मिळेल. अशा ह्या प्रकल्पाला सगळ्यानी सहकार्य करावे असे उप मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

SCROLL FOR NEXT