पणजी: राज्यात गेल्या महिनाभरात इंधन दरवाढीचा (Fuel price hike) भडका उडाला आहे. गेल्या दहा महिन्यांत राज्यात पेट्रोलच्या (Petrol) दरात तब्बल 22.67 रुपयांची वाढ झाली.
गेल्या महिनाभरात पेट्रोलच्या किमतीत 4.21 तर डिझेलच्या किमतीत 5.93 रुपयांची वाढ झाली. सर्वसामान्य नागरिक या दरवाढीमुळे त्रस्त झाले आहेत. शिवाय पेट्रोलपंप मालकदेखील हैराण झाले आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम गृहोपयोगी साहित्याच्या दरवाढीवर झाल्याने सर्वसामान्यांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे.
स्वस्त इंधन पुरविणारे राज्य म्हणून एकेकाळी गोव्याचा लौकीक होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागातून वाहनचालक गोव्यात केवळ वाहनात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी येत असत. पण आता राज्यातील स्थिती पूर्णतः पालटली आहे. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 24 टक्के तर डिझेलवरील व्हॅट 18 टक्क्यांवर नेऊन ठेवला आहे. परिणामी आता गोव्यातही इंधनाचे दर दिवसाआड वाढत आहेत. गेल्या महिनाभरात तब्बल तीन वेळा इंधनाचे दर वाढले. महिनाभरात म्हणजे 16 सप्टेंबरपासून शनिवारी 16 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पेट्रोलच्या दरात 4 रुपये 21 पैशांची वाढ झाली, तर डिझेलचा दर याच काळात 5 रुपये 93 पैसे इतका वाढला.
शुक्रवारी राज्यातील पेट्रोलचा सरासरी दर 102 रुपये 44 पैसे इतका होता, तो आज शनिवारी 103.33 पैसे इतका झाला. आठवड्यापूर्वी हा दर सरासरी 101.67 रुपये इतका होता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पेट्रोलचा दर 80.66 रुपये होता. दहा महिन्यांत तब्बल 22.67 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
असा उडाला भडका!
1 मे - 90.51 रुपयांवरून 31 मेपर्यंत 92.13 (1.62 रुपयांची वाढ)
1 जून 92.38 रुपयांवरून 30 जूनपर्यंत 96.61 (4.23 रुपयांची वाढ)
1 जुलै 96.61 रुपयांवरून 31 जुलैपर्यंत 99.58 (2.97 रुपयांची वाढ)
1 सप्टेंबर 99.19 रुपयांवरून 30 सप्टेंबरपर्यंत 99.51 (32 पैशांची वाढ)
1 ऑक्टोबर 99.76 रुपयांवरून 16 ऑक्टोबरपर्यंत 103.33 (3.18 रुपयांची वाढ)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.