रशियन युवतीचा (Russian girl) मित्राकडूनच (From a friend) खून झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: रशियन युवतीच्‍या खूनप्रकरणी मित्राला अटक

मद्यप्राशन केल्‍यानंतर पहाटे ती झोपी गेली तर तिचा मित्र डेनिस घराच्या मुख्य हॉलमध्ये झोपला होता. पोलिसांना एकातेरिना हिचा मृतदेह सापडल्यापासून डेनिस ओशेल येथून फरार होता.

दैनिक गोमन्तक

शिवोली: ओशेल-शिवोली (Oshel-Shivoli) येथे भाड्याच्‍या घरात मृतावस्‍थेत सापडलेल्‍या एकातेरिना तितोवा (३४) या रशियन युवतीचा (Russian girl) मित्राकडूनच (From a friend) खून झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यानुसार हणजूण पोलिसांनी (police) आज शनिवारी मार्ना-शिवोलीत येथून डेनिस क्रियूचकॉय (३७) या रशियन युवकास अटक केली आहे. दरम्यान, संशयिताने आपला गुन्हा कबुल केला (Confessed to the crime) असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी दिली.

पेशाने नर्तकी असलेली एकातेरिना ही १९ ऑगस्‍टला मृत्‍यूच्‍या एक दिवस अगोदर ओशेल येथे आपल्‍या खोलीवर डेनिससोबत होती. रात्री भरपूर मद्यप्राशन केल्‍यानंतर पहाटे ती झोपी गेली तर तिचा मित्र डेनिस घराच्या मुख्य हॉलमध्ये झोपला होता. पोलिसांना एकातेरिना हिचा मृतदेह सापडल्यापासून डेनिस ओशेल येथून फरार होता. दरम्यान, शवचिकित्सा अहवालात एकातेरिना हिचा मृत्‍यू नाक आणि गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली व मिळालेल्‍या गोपनीय माहितीच्‍या आधारे आज डेनिस याला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT