पाण्याच्या टंचाईमुळे टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून असलेले लोक टॅंकरचे पाणी भरताना  Dainik Gomantak
गोवा

Goa: सरकारने जाहीर केलेली मोफत पाण्याची योजना ही कागदावरच

पाणी बिलाची (Water bill) रक्कम पाहून नागरिकांच्या (citizens) पायाखालची वाळू सरकली आहे. अगोदर येणाऱ्या बिला पेक्षा दुप्पट तिप्पट पाण्याचे बिल आल्याने सदर बिल पाहून जनतेच्या नाकीनऊ आले आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: सरकारने (Government) जाहीर केलेली मोफत पाण्याची योजना ही कागदावरच टॅकरच्या पाण्याविना नागरिकांना पर्याय नाही. अजून लोक टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.तसेच या महिन्यात आलेल्या भरमसाठ पाण्याच्या बिलाने लोकांचे डोळे पाणावले. सरकारने फसवणूक केली असल्याचा आरोप, सर्वत्र नाराजीचा सूर पसरला आहे.

राज्य सरकारने एक सप्टेंबर पासून नागरिकांना 16 हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा करून महागाईच्या विळख्यात सापडलेल्या सामान्य जनतेच्या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला खरा परंतु सप्टेंबर महीन्याचे पाणी बिल हाती देऊन जनतेला वेठीस धरुन सरकारने एकप्रकारे थट्टाच चालवली आहे.

नागरिकांना देण्यात आलेली पाणी बिलाची रक्कम पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अगोदर येणाऱ्या बिला पेक्षा दुप्पट तिप्पट पाण्याचे बिल आल्याने सदर बिल पाहून जनतेच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे अगोदरपासूनच वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना सदर बिले भरावी कशी असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे त्या 16 हजार मोफत पाण्याची रक्कम सरकार नागरिकांकडून एकदमच काढत नसेल ना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

गोवा फर्स्टचे परशुराम सोनुर्लेकर यांनी सरकारने काही महिन्यांपूर्वी संपन्न झालेल्या विधानसभा (Assembly) अधिवेशनात नागरिकांना दिलासा देण्यासाठी 16 हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी एक सप्टेंबर पासून करण्यात आली होती. या वेळी नागरिकांनी या योजनेचे स्वागत केले होते. परंतु सध्या पाण्याचे बिल हातात पडताच क्षणी सरकारने जनतेची थट्टा चालवली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.तेव्हा सरकारने जनतेची चालवलेली थट्टा त्वरित थांबवावी.अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे असा निर्वाणीचा इशारा गोवा फर्स्टचे परशुराम सोनुर्लेकर यांनी दिला आहे.

काहींना महीन्याचे बिल एक हजाराच्या आसपास येत होते, परंतू सोळा हजार लिटर मोफत पाण्याची योजना लागू होताच वाढीव युनिट तसेच वाढीव रक्कम बिल आले आहे. तर मग मोफत पाणी दिले कुठे, वरून या योजने अंतर्गत नागरिकांना वाढीव दराने युनिट लागू करून पैसे वसूल केले आहेत, हे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे मुरगाव तालुक्यात बऱ्याच जणांना बिले वाढुन आली आहेत अशी माहिती परशुराम सोनुर्लेकर यांनी देऊन सरकारने या प्रकरणी फेर विचार करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान या वाढीव बिला मुळे मुरगाव तालुक्यातील सर्व भागात सरकारच्या या भुमिकेमुळे संतापाची लाट पसरली असून निवडणुकी अगोदर सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT