काबाडकष्ट करून मोठ्या प्रयत्नाने केलेली भाताची शेती (Paddy cultivation) काही क्षणात पुरातील पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसाव लागणार आहे. तिळारी धरणाचा विसर्ग झाल्याने धारणाचे पाणी सोडण्यात आले, त्यामुळे शापोरा नदीची पातळी अचानक वाढली व नदीला उधाण येऊन आगरवाडा पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांची साधारणतः चार हेक्टर भात शेती (Paddy Field) होत्याची नव्हती झाली. (Paddy Field under water)
मागचे चौदा दिवस पेडणे तालुक्यालसह संपूर्ण गोव्याला (Goa) वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले आहे. पालये - कासारवर्णे, खुटवळ, चांदेल - इब्रामपूर या भागातील भात शेती आणि केळी बागायतीचे नुकसान झाल्याच्या तक्रारी वारोंवार येत आहेत, त्यातच भर म्हणून आता आगरवाडयातील चार हेक्टर भात शेतीचे नुकसान. बागायतीत व शेतमध्ये अजूनही प्रचंड प्रमाणात पाणी साचले असल्यामुले नेमके किती नुकसान झाले, याचा अंदाज घेणे फार कठीण आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले त्यामुळे वाहतुकीला अडचणी येत होत्या .
गेल्यावर्षी तेरेखोल व शापोरा या दोन्ही नद्यांना महापूर आला होता, त्याचीच पुनरावृत्ती
गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे साधारणतः १२ कोटींचे नुकसान झाले होते. असा दावा शेतकऱ्यांनी केला होता त्यात घरे, गोठे, शेती बागायतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते . मात्र सरकारकडून अडीच कोटी रुपयांची तुटपुंजी रक्कम मंजूर करण्यात आली होती. काही शेतकरी अजूनही गेल्यावर्षीच्या नुकसान भरपाईच्या शोधात आहेत. त्यात आता हे नवीन संकट उभं ठाकले आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी नाहीसे झाले आहे, आम्ही शेतकरी अश्या परिस्थितीत कसे जगायचे अश्या दुःखी भावना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर साफ झळकत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.