Goa Tiger Reserve Project Dainik Gomantak
गोवा

Goa Tiger Project: राज्य सरकारच्या म्हणण्याला आक्षेप; न्यायालयात गोवा फाऊंडेशनचे प्रतिज्ञापत्र सादर

Goa Tiger Project: राज्यातील अभयारण्याचा भाग व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करावा, या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या गोवा सरकारच्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Tiger Project: राज्यातील अभयारण्याचा भाग व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करावा, या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या गोवा सरकारच्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

नव्या सुनावणीची तारीख या आठवड्यात निश्चित केली जाणार आहे.

या खटल्यातील प्रतिवादी गोवा फाऊंडेशनने मंगळवारी प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणणे सादर केले आहे. सरकारने याचिकेसोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील मुद्दे गोवा फाऊंडेशनने आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे खोडले आहेत.

सरकार हा प्रकल्प घोषित करण्यास चालढकल करत आहे म्हणून न्यायालयाने सरकारला तो प्रकल्प अधिसूचित करण्याचा आदेश द्यावा, ही मागणी घेऊन गोवा फाऊंडशनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने प्रकल्प अधिसूचित करण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपली.

सरकारने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, तर आदेशाचे पालन न केल्याने न्यायालयाची बेअदबी झाल्याची याचिका गोवा फाऊंडेशनने केली आहे.

तीन याचिका

कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम बंद ठेवण्याचा आदेश दिला असतानाही कर्नाटकने काम सुरू ठेवल्याने न्यायालयाची बेअदबी झाल्याविषयी गोवा सरकारने सादर केलेली याचिका, म्हादई जलवाटप तंटा लवादाने दिलेल्या निवाड्याला गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांनी दिलेल्या आव्हान याचिका, गोव्याच्या वन्यजीव संरक्षकांनी दिलेल्या आदेशाला कर्नाटकने दिलेली आव्हान याचिका यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

SCROLL FOR NEXT