Goa Forward Party  Dainik Gomantak
गोवा

विजय भिकेंच्या वक्तव्‍याचा गोवा फॉरवर्डकडून निषेध

काँग्रेसने युतीचा धर्म पाळावा

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीमध्ये युती केलेल्या काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमध्‍ये आता चकमक उडायला सुरू झाली आहे. या दोन्‍ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, एकमेकांवर आरोप-प्रत्‍यारोप करू लागले आहेत. काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी गोवा फॉरवर्डबरोबरच्‍या युतीमुळे पक्षाला नुकसान झाल्याचा आरोप केला होता. त्‍यास प्रत्‍युत्तर देताना आज गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर आणि संतोषकुमार सावंत यांनी भिके यांच्‍या वक्तव्‍याचा जाहीर निषेध करत युतीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिला.

विजय भिके यांनी केलेले आरोप पूर्णत: निराधार असून असे आरोप करण्यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी, असा सल्ला कळंगुटकर आणि सावंत यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला. कळंगुटकर म्हणाले की, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची युती केंद्रीय पातळीवर झाली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी तशी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीत आम्ही युतीचा धर्म पाळला.

काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सतत सक्रिय राहिलो. मात्र मये आणि मांद्रे मतदारसंघात काही ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा धर्म पाळला तर काही कार्यकर्ते तटस्थ राहिल्याने एकजूट झाली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही. आता सत्ताधारी भाजपविरोधात एकत्र राहून सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्‍ही प्रयत्न करणे गरजेचे आहे.संतोषकुमार सावंत म्हणाले की, मये मतदारसंघातील जनतेने आपल्याला पाठिंबा देऊन मते दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या मतदारसंघात काँग्रेस पक्ष भक्कम नसल्याने आपल्याला फायदा झाला नसला तरी त्‍या पक्षाच्‍या नेत्यांनी केलेल्या प्रचारामुळे आपल्या मतांमध्ये भर पडली. मात्र विजय भिके यांच्यासारखे कार्यकर्ते विनाकारण वाद निर्माण करत आहेत.

भिके यांना कारणे दाखवा नोटीस

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्‍यांनी केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डवर केलेले वक्तव्य भिके यांना आता चांगलेच भोवण्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहेत. गोवा फॉरवर्डच्‍या नेत्‍यांनी या कारवाईबाबत समाधान व्‍यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT