Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Municipal Elections: फातोर्ड्यासह मडगावातील पालिका प्रभागांतही निवडणूक लढवू - विजय सरदेसाई

Margao Municipal Elections: २०२६ च्या सुरुवातीला होणाऱ्या मडगाव नगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याची तयारी पक्ष करत असल्याचे गोवा फॉरवर्ड प्रमुख विजय सरदेसाई यांनी सांगितले आहे.

Sameer Amunekar

मडगाव: २०२६ च्या सुरुवातीला होणाऱ्या मडगाव नगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याची तयारी पक्ष करत असल्याचे गोवा फॉरवर्ड प्रमुख विजय सरदेसाई यांनी सांगितले आहे. पक्ष केवळ फातोर्डा येथील सर्व पालिका प्रभागांमध्येच नव्हे, तर मडगावातील प्रभागांमध्येही निवडणूक लढवेल,असेही ते म्हणाले.

पालिकेच्या प्रभागांची संख्या २५ वरून २७ पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने पक्षाकडे दुसरा पर्याय राहणार नाही. २०२६ च्या पालिकेच्या निवडणुका फातोर्डा फॉरवर्डच्या बॅनरखाली पक्ष लढणार नाही. दिगंबर कामत यांच्या ‘मॉडेल मडगाव’शी पक्षाने हातमिळवणी केली.

तेव्हा फातोर्डा फॉरवर्ड पॅनल स्थापन केले होते. कामत आता भाजपमध्ये असल्याने आम्ही एक पॅनल स्थापन करू, जे नगरपालिकेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवेल, असे ते म्हणाले.

येत्या निवडणुकीत मडगाव पालिका प्रभागांची संख्या २७ पर्यंत वाढवण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्तांकडे माध्यमांनी त्यांचे लक्ष वेधले. तेव्हा सरदेसाई म्हणाले, ‘भाजपने हे लक्षात घेतले पाहिजे की, येत्या निवडणुकीत जागांची संख्या वाढवली म्हणून पक्षाला मदत मिळणार नाही.

जर पालिका प्रभागांची संख्या २७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय हितासाठी आणि लोकांच्या प्रशासकीय सोयीसाठी घेतला जात असेल, तर तो स्वागतार्ह आहे. परंतु आमच्याकडे त्यांचा सामना करण्याशिवाय आणि लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Viral Video: अतिथी देवो भव… पण पाहुण्याची अशी बेइज्जती, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकऱ्यांनी घेतली मजा!

मुस्लिम राष्ट्रासाठी पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन लोकांवर अत्याचार करण्यात आले; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

IND vs PAK: ‘इतकी धुलाई करतील की...' पाकिस्तानी दिग्गजाला भारतीय बॅटर्स धास्ती; आशिया कपमधील भारत-पाक सामन्यावर मोठं वक्तव्य

Janmashtami 2025: फक्त 43 मिनिटांचा शुभकाळ, मग कधी आणि कशी कराल गोकुळाष्टमीची पूजा?

SCROLL FOR NEXT