Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : गोव्याचा काजू उद्योग वाचवा, असे का म्हणाले सरदेसाई?

विजय सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

Rajat Sawant

स्थानिक उद्योगांचे संरक्षण कसे करू शकतो आणि कसे केले पाहिजे याबद्दल कोणती पावले उचलावीत याबद्दल गोवा फॉरवर्डचे नेते तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांना पत्र लिहिले आहे. यावेळी त्यांनी गोवन काजूसाठी Gl टॅग मिळविण्याची प्रक्रिया वेगवान करावी अशी मागणी केली आहे.

यावेळी त्यांनी "गोवन काजूसाठी GI टॅग आवश्यक आहे. इतर राज्यातून कमी दर्जाचे काजू गोव्यात आणून तो गोवन काजू म्हणून विकणे या प्रकारामुळे स्थानिक काजू उद्योग नष्ट होत आहे अशी खंत सरदेसाईंनी यावेळी व्यक्त केली.

सरदेसाईंनी पत्रात असे नमुद केले आहे की, "गोवा काजूसाठी Gl टॅग मिळविण्याची प्रक्रिया वेगवान करावी. GI टॅग हे गोव्याच्या काजू उद्योगाला प्रोत्साहन देण्यास आणि संरक्षित करण्यास मदत करेल त्यामुळे बाहेरील लोकांकडून होणारे शोषण रोखण्यास मदत होईल."

"गोव्यात उपलब्ध असलेल्या काजूचे ग्रेड दाखवणे अनिवार्य करा तसेच W320 पेक्षा जास्त ग्रेड असलेल्या इतर राज्यांमधील काजूच्या आयातीवर आणि विक्रीवर गोव्यात बंदी घाला. आपल्याला W-240 आणि त्याहून कमी ग्रेड असलेल्या काजूला प्राधान्य देऊन सर्व ग्रेडच्या Gl टॅग केलेल्या गोवन काजूचा प्रचार करायचा आहे असे त्यांनी सांगितले.

गोव्यातील काजू उद्योगाला संरक्षण देण्यासाठी कृषी आणि आरोग्यमंत्र्यांसह व्यापार आणि वाणिज्य मंत्र्यांनाही विनंती करणार आहे. मला आशा आहे की तुम्ही ही बाब गांभीर्याने घ्याल आणि गोव्यातील लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी योग्य ती कारवाई कराल अशी आशा सरदेसाईंनी यावेळी व्यक्त केली.

 बदलते हवामान, पीक संरक्षणाचे उपाय न करणे, वन्य प्राण्यांचे आक्रमण, पिकाला पोषक वातावरण नसणे, अवेळी पडणारा पाऊस त्यामुळे काजूचे उत्पन्न घटून मोठी जुनी झाडे मरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बागायतदार वर्गाचे काजू पिकाचे आर्थिक गणितही बिघडले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

SCROLL FOR NEXT