Vijai Sardesai
Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: राज्यात भाजपचे कार्यकर्ते अमली पदार्थाचा व्यापार चालवतात

दैनिक गोमन्तक

गोवा हे ड्रग्जसाठीचे केंद्र आहे, आणि भाजपचे कार्यकर्ते ड्रग्जचा व्यापार चालवत आहेत. असा आरोप गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. यावेळी सरदेसाई यांनी गोव्यात गांजा लागवडीला कायदेशीर मान्यता देण्यासाठी सरकार पुन्हा पाऊल उचलेल, अशी भीती व्यक्त केली.

(Goa Forward Party president Vijai Sardesai alleged state government)

सरदेसाई पुढे म्हणाले की, राज्यात अमली पदार्थविरोधात कारवाई करत “तेलंगणा पोलिसांनी हे सिद्ध केले आहे. गोवा पोलिसांकडे उत्तर नाही, कारण प्रत्येक गोष्टीत राजकीय हस्तक्षेप आहे. सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते अंमली पदार्थांचा व्यापार चालवत आहेत. गांजा पक्ष राज्य चालवत आहे. राज्याच्या संरक्षणाशिवाय अमली पदार्थांचा व्यापार होऊ शकत नाही. तेलंगणा पोलिसांनी स्पष्टपणे दाखवून दिले आहे की, ड्रग्सना राज्य संरक्षण मिळाले आहे.

गोव्यात गांजा लागवडीला कायदेशीर मान्यता देण्यासाठी सरकार पुन्हा पाऊल उचलेल, अशी भीती त्यांनी व्यक्त करत निवडणुकीपूर्वी, गांजा कायदेशीर करण्याचा सरकारचा हेतू होता, कागदपत्रे (मंत्रिमंडळात) प्रसारित केली जात होती. आता निवडणूक जिंकून ते कायदेशीर करणार आहेत. भाजपचे कार्यकर्ते अमली पदार्थांचा व्यापार चालवत आहेत, आणि यातून येणारा पैसा निवडणुकीत तसेच या पैशातून आमदार खरेदी केले गेले. आणि उरलेल्या रकमेतून ते नगरसेवक खरेदी करतील, असा ही आरोप यावेळी सरदेसाई यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT