काणकोण: काणकोण तालुक्याचा तिसऱ्या जिल्ह्यात समावेश केल्यास तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय काणकोण असावे, अन्यथा गोवा फॉरवर्ड पक्ष या विषयावर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
आजपर्यंत काणकोण (Canacona) तालुक्याचा समावेश दक्षिण गोव्यात आहे व त्याचे मुख्यालय मडगाव आहे. त्यामुळे वाहतूक व बससेवा या दृष्टीने ते सोयीस्कर आहे.तिसऱ्या जिल्ह्यात काणकोण, केपे, सांगे व धारबांदोडा व फोंडा तालुक्याचा समावेश करण्याचे घाटत आहे.
तसे असल्यास या जिल्ह्याचे मुख्यालय मध्यवर्ती ठिकाणी सांगे, केपे यासारख्या ठिकाणी केल्यास काणकोणवासीयांना बससेवा व सर्वच दृष्टीने ते कटकटीचे बनणार आहे. काणकोणमधून थेट बससेवा केपे, सांगे येथे नाही. त्यापेक्षा काणकोणातून दर पंधरा मिनिटांनी मडगाव अशी बससेवा आहे. त्याशिवाय अनेक कुटुंबे मडगावला कामानिमित्त स्थलांतरित झाली आहेत. मात्र त्यांचा जमीन जुमला व मताधिकार काणकोणात आहे. आमचा तिसऱ्या जिल्ह्याला विरोध नाही, मात्र मुख्यालय कोठे ते सरकारने स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे नाईक यांनी सांगितले.
सभापती डॉ. रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) यांनी पक्षाचे व सरकारशी या तिसऱ्या जिल्ह्याबाबत संगनमत न करता लोकांच्या अपेक्षा समजून घ्याव्यात गरज पडल्यास सरकारने या विषयावर जनमत कौल घ्यावा. मडगाव सोडून अन्य ठिकाणी काणकोण तालुक्याचा समावेश असलेल्या जिल्ह्याचे मुख्यालय नेण्याचा प्रयत्न झाल्यास गोवा फॉरवर्ड पक्ष जनतेला एकत्र करून प्रखर आंदोलन छेडणार आहे,असे प्रशांत नाईक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.