South Goa Hospital Dainik Gomantak
गोवा

South Goa Hospital: जिल्हा रूग्णालय इमारतीत खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास गोवा फॉरवर्डचा विरोध

मडगाव आणि फोंडा येथील इस्पितळात असलेल्या त्रुटीबद्दल आज सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना एक सविस्तर पत्र लिहिले आहे.

सुशांत कुंकळयेकर

South District Hospital, Margao: मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालय इमारतीत खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) विरोध केला आहे. इमारतीत खासगी महाविद्यालय सुरू केल्यास किंवा या रूग्णालयचे खासगीकरण केल्यास गोवा फॉरवर्ड त्याला कडाडून विरोध करेल असा इशारा पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

मडगाव आणि फोंडा येथील रूग्णालयात असलेल्या त्रुटीबद्दल आज सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना एक सविस्तर पत्र लिहिले आहे. दोन्हीं इस्पितळे खासगी संस्थेच्या हातात देण्याऐवजी या दोन्ही रूग्णालयाचा कारभार सुधारण्याठी एक कृती दल स्थापन करून लोकांना येथे कशा चांगल्या सुविधा आणि उपचार देता येतील याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे. सरदेसाई यांनी नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात या दोन्ही रूग्णालयातील सुविधांवर चर्चा केली होती.

दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयाचे वरचे दोन मजले विनवापर पडून आहेत. या दोन्ही मजल्यांचा इस्पितळासाठीच वापर करून हे 500 खाटांचे परिपूर्ण रूग्णालय करावे असे सूचित करून या रूग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने अजूनही 10 टक्के रुग्णांना गोमकॉ रूग्णालयात पाठविण्यात येत असल्याच्या प्रकारावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयात ओर्थोपेडिक कन्सल्टंट, न्यूरोलोजिस्ट तसेच कार्डीओलोजिस्ट नसल्याने लोकांना या रूग्णालयात उपचार मिळत नाहित. येथील रुग्णांची संख्या वाढल्याने येथे परिपूर्ण असे कार्डियक केंद्र, 24 तास खुली फार्मसी, परिपूर्ण रक्तपेढी सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

फोंडा येथील रूग्णालयात आणखी एक रेडिओलोजिस्ट, नेत्र तपासणी ओपिडी, परिपूर्ण अशी रक्तपेढी, सिटी स्कॅन सुविधा, न्यूरोलोजिस्ट आणि तातडीने एक्स रे ऑपरेटर नेमण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मधुमेह रुग्ण आणि ह्रदय शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांसाठी औषधे उपलब्ध करण्याची गरज या पत्रात व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT