Goa Forward Party  Dainik Gomantak
गोवा

Goa Forward Party: ...मग मुख्यमंत्री खासगी विमानाने सोलापूर, कोल्हापूर, अंदमानला कसे फिरतात?

Akshay Nirmale

Goa Forward Party: आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेल्याच्या किंमती वाढत असताना मुख्यमंत्री खासगी विमानाने सोलापूर, कोल्हापूर, अंदमान-निकोबारला कसे फिरताना दिसतात, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला नेत्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी आणि गोव्यातील भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख सुलक्षणा सावंत यांच्यावर केली.

सुलक्षणा सावंत यांनी देशांतर्गत पेट्रोल-डीझेलचे दर आंतरराष्ट्रीय दरांनुसार ठरतात. त्यानुसार गोव्यातही गॅस सिलिंडर दरवाढ झाली. त्याला काहीही करता येत नाही. इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यास काँग्रेसला कुणी रोखलेले नाही, असे वक्तव्य केले होते.

त्या विषयावर बोलताना गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला नेत्यांनी पत्रकार परिषदेत ही टीका केली. या वेळी पक्षाच्या नेत्या निमेसिया फालेरो, आशमा सय्यद, पुजा नाईक उपस्थित होत्या.

पत्रकार परिषदेत निमेसिया फालेरो म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय पातळीवर नैसर्गिक वायूच्या किंमतीत सप्टेंबरमध्ये 9 डॉलर होते तर मार्चमध्ये 3 डॉलरवर किंमती आल्या आहेत. म्हणजेच 6 डॉलरने किंमतीत घट झाले. त्यामुळे दरवाढ झाली हा प्रश्च येतच नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला. अभ्यासाविना केलेले हे वक्तव्य आहे.

फालेरो म्हणाल्या, प्रत्येक घरात एक गॅस सिलिंडर मोफत देणार असे आश्वासन दिले होते. ते कुठे गेले? ते केवळ निवडणुकीपुरते आश्वासन होते. साखळी मतदारसंघात गावागावातील लोक आता चुलीकडे वळू लागले आहेत, हे कशाचे द्योतक. सिंलिंडरची दरवाढ हेच यामागचे कारण आहे.

गोमंतकीयांच्या अवस्थेची काहीही काळजी सरकारला नाही. भाजपच्या महिला नेत्यांना खरेच गृहिणींची काळजी असती, गृहिणींच्या समस्यांची त्यांना जाण असती तर महागाईबाबत दरवाढीबाबत त्यांच्या शिष्टमंडळाने सरकारला निवेदन दिले असते. पण त्या वरून जे सांगितले जाते, तेच त्या बोलतात.

फालेरो म्हणाल्या, दरवाढीचा निषेध करायचा सोडून आंतरराष्ट्रीय दरांकडे काय बोट दाखवता? एखादी बाई घर चालवते. तिलाच हे कळू शकते. तुम्हाला काही करता येत नसेल तर अशी वक्तव्ये तरी करू नका. अशा वक्तव्यांचा त्रास होतो, अशी वक्तव्ये करून तुम्ही महिलांना त्रास देऊ नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT