Congress lacks unity says Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजपचा पराभव करण्यासाठी एकीची गरज, काँग्रेसमध्ये त्याचाच अभाव; विजय सरदेसाईं

Vijai Sardesai On Congress And BJP: फक्त बोलून चालणार नाही भाजपचा पराभव करण्यासाठी एकीची गरज असल्याचे मत विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

Pramod Yadav

पेडणे: भाजपचा पराभव करण्यासाठी एकीची गरज (विरोधकांमध्ये) असल्याचे मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मांडले. तर, काँग्रेसमध्ये एकीचा अभाव असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. काँग्रेस पक्षासाठी मी सकारात्मक विचार करतो, असेही सरदेसाई म्हणाले.

पेडणे तालुक्यातील माजी सरपंच आणि पंच सदस्यांनी आज (०५ सप्टेंबर) गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला. मांद्रेचे माजी सरपंच अमित सावंत, मांद्रेचे पंचायतीचे सदस्य मयुर परब, धारगळचे पंच सदस्य अनिकेत साळगावकर आणि पाळीचे माजी उपरसरपंच कृष्णा नाईक यांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला. यावेळी विजय सरदेसाई बोलत होते. सरदेसाईंनी यावेळी काँग्रेस आणि भाजपबाबत मत मांडले.

"भाजपला जागा दाखवायची असेल तर आपल्यात एकी आवश्यक आहे. पण, काहीजण सर्व ४० जागा लढणार असल्याचा दावा करतात. प्रत्येक पक्षाला त्यांचा विस्तार करायचा आहे, तो पक्षाला अधिकारही आहे. दरम्यान, ४० जागा लढविण्याचा दावा कोणीतरी करते त्यावेळी खरचं त्यांच्याकडे तेवढे उमेदवार आहेत? हा प्रश्न देखील उपस्थित होतो. सध्याच्या घडीला माझ्याकडे देखील ४० उमेदवार नाहीत," असे विजय सरदेसाई म्हणाले.

"गोव्यातील नागरिकांना राजकारण शिकविण्याची गरज नाही, त्यांना गणित कळतं. गोमंतकीय सृसंस्कृत मतदार आहे. पहिल्यांदा मी अपक्ष म्हणून निवडून आलो त्यानंतर स्वत:चा पक्ष काढला. पण, ४० जागा लढविण्याचा दावा करणाऱ्यांनी आपण काय बोलतोय याचा विचार करावा", असे विजय सरदेसाई म्हणाले. "मी काँग्रेसबाबत देखील सकारात्मक विचार करतो", असे सरदेसाईंनी नमूद केले.

"२०२२ मध्ये आमची काँग्रेससोबत युती होती यानंतर लोकसभा निवडणुकीत देखील आम्ही सोबत होतो. युती झाली त्यावेळी असणारी काँग्रेसमधील नेतृत्व सध्या तिथे नाहीये. सध्याच्या काँग्रेसमध्ये एकीचा अभाव आहे. पण, केंद्रीय नेतृत्व पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे", असे विजय सरदेसाई काँग्रेसबाबत बोलताना म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT