गोवा फॉरवर्डने दिली राज्यपालांना कॅश फॉर जॉब घोटाळ्याची माहिती

 

Dainik Gomantak

गोवा

गोवा फॉरवर्डने दिली राज्यपालांना कॅश फॉर जॉब घोटाळ्याची माहिती

गोवा फॉरवर्ड पक्षाचे संघटनमं दुर्गादास कामत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या घोटाळ्याची माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोवा फॉरवर्ड पक्षाच्या (Goa Forward Party) नेत्यांनी बुधवारी राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई (Governor PS Sreedharan Pillai) यांची भेट घेऊन भाजपच्या (BJP) नोकरी (Job Scam) विक्री घोटाळ्यात हस्तक्षेप करण्याची विनंती करणारे निवेदन सादर केले आणि सरकारकडून (Goa Government) या संदर्भात अहवाल मागवण्याचे आवाहन केले.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे संघटनमं दुर्गादास कामत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या घोटाळ्याची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष डॉ. रेणुका डा सिल्वा, अॅड. आश्मा बी आणि इतर उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना कामत म्हणाले की, राज्यपालांनी ’जॉब फॉर सेल’ घोटाळ्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. “परीक्षेत फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आम्ही त्यांना दिली आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.” असे कामत म्हणाले.

कामत म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खात्या मधील सुमारे २७ तांत्रिक सहाय्यक अजूनही नियमित होण्यासाठी धडपडत आहेत, परंतु सरकारने त्यांची मागणी बाजूला सारून नवीन पदांची भरती सुरू केली आहे. "अनुभवी कर्मचाऱ्यांना वंचित ठेवून नव्या उमेदवारांना का घेत आहेत." असा प्रश्न कामत यांनी केला.

नोकरीसाठीचे भाजप सरकारचे ‘मेनू कार्ड’ राज्यपालांसमोर ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “ आमच्या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ऑगस्टमध्ये हा घोटाळा उघड केला होता. तेव्हापासून हा घोटाळा थांबवावा यावर आमचा भर आहे. मात्र, भाजपने निवडणुकीसाठी पैसे आणि मते मिळवण्यासाठी ते चालू ठेवले.’’ असे कामत म्हणाले.

यावेळी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भाजप सरकारविरोधात संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, नवीन भरतीमुळे सध्याचे कंत्राटी कर्मचारी बाहेर पडतील आणि नोकऱ्या खरेदी करणाऱ्यांना नोकऱ्या मिळतील. 'सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. आम्ही सर्वांनी आमची मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. पण त्यांनी काहीही केले नाही.” असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT