पणजी: राज्य सरकारच्या विधीमंडळ सचिवालयात नियमबाह्य पद्धतीने चार कक्ष अधिकाऱ्यांची भरती करण्याचा सरकारने प्रयत्न केल्यास, प्रसंगी आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाने दिला आहे. पक्षाच्या कर्मचारी विभागाचे निमंत्रक जॉन नाझारेथ यांनी आज पत्रकार परिषदेत असा इशारा दिला आहे. (Goa Forward: force the Goa government to follow the rules)
त्यानी सांगितले 28 एप्रिल रोजी विधीमंडळ सचिवालयातील चार कक्ष अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली. यापैकी तीन जागा अनारक्षित तर 1 जागा इतर मागासवर्ग यासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. त्यानंतर ती जाहिरात मागे घेण्यात आली. या विषयावर आम्ही माहिती घेतल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून आपले काही उमेदवार त्या पदावर नेमण्यासाठी नियमामध्ये दुरुस्ती करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
सरकारने आपल्या मर्जीतील उमेदवार तेथे नेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही न्यायालयात दाद मागण्याची तयारी करत आहोत. यापूर्वीही सरकारने नियमबाह्य पद्धतीने केलेल्या कामांना आम्ही न्यायालयात जाऊन विरोध केला आहे आणि सरकारला नियमांचे पालन करण्यास भाग पाडले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.