Goa Forward Public Outreach Campaign Dainik Gomantak
गोवा

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Goa Assembly Session Public Issues: ४ ऑगस्टपर्यंत publicsuggestions@goaforward.in या ई-मेलवर सूचना पाठवाव्यात, असे आवाहन पक्षाने केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाने जनतेच्या समस्या थेट विधानसभेत मांडण्यासाठी स्वतंत्र लोकसंपर्क मोहिमांची घोषणा केली आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी ‘आमचो आवाज विजय’ या मोहिमेची सुरवात करत नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न, सूचना व तक्रारी पाठविण्याचे आवाहन केले. विधानसभा हे लोकांच्या अपेक्षा व समस्यांचे प्रतिबिंब उमटविणारे सर्वोच्च व्यासपीठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी ४ ऑगस्टपर्यंत publicsuggestions@goaforward.in या ई-मेलवर सूचना पाठवाव्यात, असे आवाहन पक्षाने केले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘कनेक्ट विथ गोवा सीएलपी-आवाज तुमचो, सांगात आमचो’ या उपक्रमाची घोषणा केली. प्रत्येक गोमंतकीयाचा आवाज काँग्रेस विधिमंडळ पक्षापर्यंत पोहोचवून तो विधानसभेत मांडण्याचा या मोहिमेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य, शेती, पायाभूत सुविधा, कायदा-सुव्यवस्था, पर्यावरण तसेच स्थानिक प्रश्नांबाबत नागरिकांनी connectwithgoaclp@gmail.com या ई-मेलवर सूचना पाठवाव्यात, असे आवाहन केले आहे.

मोहिमांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

यंदाचे पावसाळी अधिवेशन नेहमीच्या १५ दिवसांऐवजी केवळ तीन दिवसांचे होणार असल्याने, अधिवेशनापूर्वी जनतेच्या प्रश्नांचे संकलन करण्यासाठी दोन्ही पक्षांनी सुरू केलेल्या या मोहिमांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.15, 2.28 की 2.57? 8व्या वेतन आयोगात बेसिक पे किती वाढणार, तुमचा पगार आणि एरियर कसा मोजला जाणार? पाहा संपूर्ण गणित

Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

Rule Change: LPG सिलेंडर, FD, ATMपासून वाहनांच्या किमतीपर्यंत; 1 ऑक्टोबरपासून बदलले 6 मोठे नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

SCROLL FOR NEXT