Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Goa Forward Party: भाजपला सत्तेवरून दूर करण्यासाठी सर्व समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी हाक गोवा फॉरवर्ड पक्षाने पुन्हा दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: भाजपला सत्तेवरून दूर करण्यासाठी सर्व समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी हाक गोवा फॉरवर्ड पक्षाने पुन्हा दिली आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सर्व समविचारी पक्षांशी तातडीने चर्चा सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

गोवा फॉरवर्ड काँग्रेसशी युती करणार की काँग्रेसमध्ये विलीन होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजपच्या कथित हुकूमशाही, भ्रष्टाचार आणि सूडबुद्धीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी विरोधकांनी एकाच मंचावर येण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

जनभावनेचा आदर करून भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांशी तातडीने चर्चा करण्यात येईल, असे सरदेसाई यांनी सांगितले. दरम्यान, गोव्यातील निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांबाबतही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली जात असल्याचे ठोस पुरावे असल्याचा दावा गोवा फॉरवर्डने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Healthcare Facilities: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मोठा बदल! नर्सिंग महाविद्यालय जुन्या हॉस्पिसिओ इमारतीत हलविणार

Viral Video: ना पेट्रोलचा खर्च, ना ट्रॅफिक जामची चिंता! पठ्ठ्या थेट पॅरामोटरने जातो ऑफिसला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खरी कुजबुज: दोन पंच गेले कुणीकडे?

Chemical Company Blast: भरुचमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान अपघात; 5 मृत्यू, 2 गंभीर जखमी

Delhi Capitals Bowling Coach: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक! 761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती

SCROLL FOR NEXT