मडगाव: आर्थिक व्यवहारातून माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना १३ लाखांचा गंडा घालण्यात आला. पाशेको यांनी यासंबंधी कोलवा पोलिस स्थानकात फिडोल परेरा व क्लाव कार्दोज या दोघांविरोधात तक्रार नोंद केली आहे.
या वर्षी जून व जुलै २४ दरम्यान ही घटना घडली. कोलवा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या १२६ (२) , ३२९ (३) , ३५२ , ३८१ ( ३) व ३०८ (४) कलमान्वये हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. मिकी पाशेको यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
कोलवा पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्याशी संपर्क साधला असता आमच्याकडे तक्रार आली असून, आम्ही सध्या संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास चालू असल्याचे सांगण्यात आले.
पाशेको यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांनी आपल्या मालमतेत बेकायदा प्रवेश केला आणि आपली पत्नी व अन्य कर्मचाऱ्यांना दमदाटी केली व धमकी दिली. त्यानंतर फिडोलने मोबाईलवरून मेसेज व व्हॉइस कॉल करून बॅंकेतून व कोऱ्या धनादेशाद्वारे १३ लाख रुपये हडप केले. उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.