forest claims Goa 2025 Dainik Gomantak
गोवा

'वन हक्का' खालील 10 हजार दावे 19 डिसेंबर 2025 पर्यंत मार्गी लावण्याचे लक्ष्य; थेट मुख्यमंत्र्यांची माहिती!

Goa forest rights: वन हक्क कायद्याखालील उर्वरित सुमारे १० हजार प्रकरणे १९ डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे

Akshata Chhatre

Goa CM forest announcement: राज्य सरकारने आदिवासी समाजाच्या समस्यांकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. वन हक्क कायद्याखालील उर्वरित सुमारे १० हजार प्रकरणे १९ डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. या मोहिमेद्वारे पात्र लाभार्थ्यांना न्याय देणे व गैरफायदे रोखणे, हा मुख्य उद्देश आहे.

वन हक्क कायद्याखालील तब्बल १० हजार प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घातले आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी (दि.४) मंत्रालयात उच्च स्तरीय बैठक घेऊन १९ डिसेंबरपर्यंत सर्व खासगी वन हक्क प्रकरणांचा निपटारा करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी १४ जूनला विशेष शिबिरे घेण्यात येतील आणि १८ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रलंबित अर्जावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयांची माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, राज्यातील खासगी वन हक्क दाव्यांचा पूर्ण निपटारा १९ डिसेंबर २०२५ पूर्वी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत प्रलंबित अर्जांची प्रक्रिया गतीने मार्गी लावण्यासाठी १४ जून रोजी उपजिल्हाधिका-यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सहा तालुक्यांमध्ये विशेष शिबिरे भरविण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

Goa Politics: 2012 मध्ये 8 भंडारी आमदार, आता मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा; 2027 मध्ये समाजाचे राजकीय समीकरण काय?

Horoscope: 4 ऑक्टोबरचा दिवस ठरणार खास! 'या' राशींचं नशीब उजळणार; नोकरी-व्यवसायात मोठा फायदा, प्रेमजीवनही होईल सुखकर

God In Difficult Times: सुखात देवाचा विसर, दुःखात आर्त हाक; संकटांच्या काळातच का अधिक घट्ट होतं भगवंताशी नातं?

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

SCROLL FOR NEXT