Forest Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ हत्तीसाठी वनताराशी संपर्क! विश्वजीत राणे बंदोबस्तासाठी सरसावले; वन खाते ॲक्शन मोडमध्ये

Forest Minister Vishwajit Rane: ओंकार हत्तीच्‍या बंदोबस्‍तासाठी राज्‍य सरकार महाराष्‍ट्र, कर्नाटक सरकार तसेच वनताराच्‍या संपर्कात असल्‍याची माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोवा-महाराष्‍ट्र असा सातत्‍याने प्रवास करीत असलेल्‍या ओंकार हत्तीच्‍या बंदोबस्‍तासाठी राज्‍य सरकार महाराष्‍ट्र, कर्नाटक सरकार तसेच वनताराच्‍या संपर्कात असल्‍याची माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ओंकारचा लवकरात लवकर बंदोबस्‍त करण्‍याचे निर्देश प्रधान वन संरक्षक आणि मुख्‍य वॉर्डनना देण्‍यात आले असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

ओंकार गोव्‍यातून महाराष्‍ट्रात गेल्‍यानंतर त्‍याला तेथून पुन्‍हा गोव्‍यात हुसकावले जाते. गोव्‍यात आपल्‍यानंतर त्‍याच्‍याकडून शेतकऱ्यांच्‍या पिकांची नासाडी होत आहे. त्‍यामुळेच त्‍याचा लवकरात लवकर बंदोबस्‍त करण्‍याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. त्‍यासाठी राज्‍य सरकार महाराष्‍ट्र, कर्नाटक सरकारांसमवेत ‘वनतारा’च्‍याही संपर्कात असल्‍याचे मंत्री राणे म्‍हणाले.

कर्नाटक ओंकार हत्तीला पकडण्‍यास तयार आहे. त्‍याबाबतच्‍या साधनसुविधाही त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध आहेत. परंतु, त्‍याला ठेवण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडे जागा नाही. त्‍यामुळे राज्‍य सरकार वनताराच्‍या संपर्कात आहे. वनतारा ओंकारला स्‍वीकारण्‍यास तयार झाले, तर अनेक प्रश्‍‍न मिटतील, असेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Wisdom of the Fourth Tree: तीन झाडांचा अहंकार मोडला, चौथं झाड मात्र आनंदात जगलं; आयुष्याचा मोठा धडा शिकवणारी गोष्ट!

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

SCROLL FOR NEXT