Suleman Khan Mobile Canva
गोवा

Suleman Khan: सुलेमानने कारागृहातून संभाषण केलेल्या 'मोबाईल'ची तपासणी; तथ्यहीन विधाने केल्याचे पोलिस अधीक्षकांचे स्पष्टीकरण

Suleman Khan Case: सिद्दीकी ऊर्फ ​​सुलेमान खान याने पत्रकारांना दिलेल्या सर्व विधानांमध्ये असत्यापित (तथ्यहीन) दावे आहेत. त्याच्याविरुद्ध जमीन हडपप्रकरणी अनेक गुन्हे नोंद आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Suleman Khan Case Updates

पणजी: जमीन हडप प्रकरणातील मास्टर माईंड सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याच्याकडून कोलवाळ कारागृहातून जप्त केलेला मोबाईल संच तपासणीसाठी गोवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (जीएफसीएल) पाठवण्यात आला आहे. तसेच सुलेमानला न्यायालयात घेऊन गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

सिद्दीकी ऊर्फ ​​सुलेमान खान याने पत्रकारांना दिलेल्या सर्व विधानांमध्ये असत्यापित (तथ्यहीन) दावे आहेत. त्याच्याविरुद्ध जमीन हडपप्रकरणी अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यातील काहींचा तपास सुरू आहे, तर काही न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे त्याच्या काही विधानांचा उद्देश साक्षीदारांना त्यांचे जबाब पोलिस किंवा न्यायालयात देण्यापासून रोखण्यासाठी केलेला प्रयत्न असू शकतो.

सुलेमान याने कारागृहातून थेट एका वृत्तवाहिनीशी संपर्क साधून सुमारे २० मिनिटांहून अधिक काळ संभाषण केले होते. त्यासाठी त्याने जप्त केलेला मोबाईल वापरला होता का? त्याच्याकडून अनेक व्हिडिओ काढून घेण्यात आल्याचा कथित आरोप त्याने केला आहे.

पोलिसांचीही चौकशी

सुलेमानला पोलिस संरक्षण देताना त्याच्यासोबत असलेल्या पोलिसांकडून काही त्रुटी राहिल्या का, हेही तपासण्यात येत आहे. न्यायालयात नेताना व परत आणताना संशयिताला कोणाशीही बोलण्याची मुभा नसते. पोलिसांनी त्याला बोलण्यास अटकाव करायला हवा होता. तो झाला का याची चौकशी होत आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT