Goa Forward AAP Alliance Dainik Gomantak
गोवा

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

Goa First Alliance 2027: शनिवारी मडगाव येथे झालेल्या गोवा फॉरवर्डच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना सर्वाधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: 'आप' आणि गोवा फॉरवर्ड तसेच अन्य समविचारी लोक यांना एकत्र आणून ‘गोवा फर्स्ट’ ही आघाडी करण्याचे आता नक्की झाले असून शनिवारी मडगाव येथे झालेल्या गोवा फॉरवर्डच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना सर्वाधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, १३ सप्टेंबर रोजी ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई पणजी येथे एक पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी समान विचारसरणीच्या धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांसोबत त्वरित आघाडी करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असे नंतर सरदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले.

फातोर्डा येथील ‘गोयकार घर’ येथे पार पडलेल्या या बैठकीत पक्षाने आपला आगामी अजेंडा स्पष्ट केला. पक्षाने ‘गोवा फर्स्ट’चा संदेश दिला असून, पक्ष आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षांपेक्षा गोव्याचे हित प्रथम असल्याचे म्हटले आहे. ‘गोयकारपण’ जपण्यासाठी तसेच भ्रष्टाचार, जातीयवाद आणि पक्षांतराच्या राजकारणाला कडाडून विरोध करण्यासाठी एकजूट पर्याय उभा करणे हे या आघाडीचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे, असे या बैठकीत सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT