Fire In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Case: पुन्हा डोंगर, आग आणि संशयाचा धूर! मोरजी पंचायत क्षेत्रातील डोंगर माळरानवर आगीच्या घटना सुरु

Goa Fire Case: रात्री अपरात्री डोंगर माळरानावर मोठ्या प्रमाणात आगी लावण्याचा प्रकार घडत आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Fire Case: गोव्यात पुन्हा आगींचे सत्र सुरु होतंय की काय अशी भीती वर्तवली जावी अशा घटना सध्या गोव्यात नव्याने सुरु झाल्या आहेत.

काल म्हणजेच बुधवारी साखळी, डिचोली, कुळण भागात काजू बागांना आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती आता उत्तर गोव्यात होताना दिसतेय.

मोरर्जी पंचायत क्षेत्रातील किनारी भागातील जमिनी विकून संपल्यानंतर आता शेतजमीन आणि डोंगर माळरानावर जमिनी विकत घेऊन डोंगरांना आगी लावून झाडे भस्मसात करण्याचा प्रकार घडत आहे.

दिल्ली भागातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात मोरर्जी पंचायत क्षेत्रातील डोंगर माळराने विकत घेतलेली असून काही जमिनींची अद्याप विक्री झालेली नाही.

त्या शिल्लक जमिनीतील काजू बागायतीना आगी लावण्याचे प्रकार सध्या घडत असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

पंचायत मंडळही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येते. 80% डोंगर माळरानावरील जमिनी विकत गेल्यानंतर काही ज्या शिल्लक आहेत, आणि ज्या जागेमध्ये काजू बागायती झाडे आहेत त्या माळरानावर सध्या आगी लावून डोगर सपाट करण्याचा प्रकार सुरू आहे.

रात्री अपरात्री अशा डोंगर माळरानावर मोठ्या प्रमाणात आगी लावण्याचा प्रकार घडत असून शेकडो झाडे भस्मसात केली जात आहेत आणि विशेष म्हणजे याविषयी कोणीही तक्रार नोंद करत नाही तर कुणी आवाजही उठवत नाहीए. त्यामुळे या प्रकाराला प्रशासनाचा हातभार आहे की काय असा संशय आता निर्माण होऊ लागलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

SCROLL FOR NEXT