Goa Fire Case Dainik Gomantak
गोवा

Aldona Fire Case: वीज वाहिनीला आग प्रकरण! विकास कामे सुरू झाल्यानेच अनेकांची मने कलुषित- फेरेरा

Goa Fire Case: नैराश्यातून अशी कृत्ये केली जात आहेत- कार्लोस फेरेरा

Ganeshprasad Gogate

Goa Fire Case: हळदोण्यातील विकासामुळे नैराश्य आलेल्या विरोधकांकडून ज्यात आपल्या राजकीय विरोधकांचाही समावेश असू शकतो अशा घटकांकडून भूमिगत वीज वाहिन्या जाळण्याचा प्रकार घडला असावा, असा गंभीर आरोप आमदार कार्लोस फेरेरा यांनी केला.

पर्वरी येथे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. फेरेरा म्हणाले की, सार्वजनिक मालमत्तेची कोणीही हानी करता कामा नये, कारण ती जनतेची मालमत्ता असते. हळदोणामध्ये विकास कामे सुरू झाल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे.

त्या नैराश्यातून अशी कृत्ये केली जात आहेत. भूमिगत वीज वाहिनीला आग लावण्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते ती करूनच हा उपद्रव देण्याचा झाला आहे, असे ते म्हणाले.
काहींना मी आवडत नसावा, त्यामुळे ते माझे विरोधक झाले असावेत.

पुरावे मिळेपर्यंत कोणावर थेट आरोप करता येत नाही. मात्र भूमिगत वीज वाहिनी जाळण्यामागे विकास कामांमुळे विरोधकांना आलेले नैराश्य यापेक्षा दुसरे काही कारण दिसत नाही. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्या प्रकल्प पूर्ण केला जाईल.

जनतेने संघटितपणे अशा प्रकारांचा मुकाबला केला पाहिजे. त्यांना कुठूनही या संदर्भात मिळालेली माहिती त्यांनी संबंधितांपर्यंत पोहोचवली तर असे प्रकार भविष्यात थोपवता येऊ शकतील, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT