Luthra brothers nightclub case Dainik Gomantak
गोवा

गोवा आग दुर्घटना! नाईटक्लब मालक लुथरा बंधुंचा जेलमधील मुक्काम वाढला, पोलिस कोठडीत चार दिवस वाढ

Goa Nightclub Fire Case: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा या बंधुंच्या पोलिस कोठडीत २९ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Pramod Yadav

पणजी: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा यांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दोघांना आज (२६ डिसेंबर) दुपारी म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत २९ डिसेंबरपर्यंत वाढ केलीय. लुथरा बंधुंनी यावेळी तपासाह सहकार्य करण्याचे न्यायालयाला सांगितले.

बनावट कागदपत्र संबधित प्रकरणात लुथरा बंधुंनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. दुसरीकडे म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने आगीच्या घटनेतील दुसरा संशयित भरत कोहली याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या हमीवर न्यायालयाने भरत कोहलीला जमीन दिला आहे. भरत नाईटकल्बचे रोजचे व्यवस्थापन आणि कामकाज पाहण्याचे काम करत होता.

बनावट कागदपत्र संबंधित प्रकरणी गौरव आणि सौरभ लुथरा बंधुंविरोधात म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी लुथरा बंधुंनी अटकपूर्व जामिनासाठी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. जीएस हॉस्पिटॅलिटी गोवा हडफडे कंपनीचा एक संचालक अजय गुप्ता अगोदरच पोलिस कोठडीत आहे.

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. यात पर्यटक आणि क्लबमधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या घटनेनंतर क्लबचे मालक लुथर बंधू थायलंडला फरार झाले होते. गेल्या आठवड्यात भारतात आणल्यानंतर गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT