MLA Praveen Zantye with the disaster victims in Mayem, Goa. On 05 Aug, 2021. Tukaram Sawant / Dainik Gomantak
गोवा

Goa: मयेतील वादळग्रस्त पीडितांना अर्थसाहाय्य

वादळ आणि पूरग्रस्तांना सरकारकडून निश्चितच भरपाई (Indemnity) मिळणार (Goa)

Tukaram Sawant

डिचोली: 'तौक्ते' चक्रीवादळाचा (Toukte Storm) तडाखा बसून नुकसान झालेल्या मयेतील आपदग्रस्तांना (Mayem Disaster stricken) मुख्यमंत्री सहायता निधीतून (CM Assistance Fund) आर्थिक मदत करण्यात आली आहे. मयेचे आमदार तथा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये यांनी डिचोली येथे आपल्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीचे धनादेश (Cheque) वितरीत केले. मये मतदारसंघातील (Mayem Constituency) एकूण 25 जणांना धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, शिरगावचे सरपंच अच्युत गावकर, नार्वेची सरपंच मनीषा आमोणकर, मयेची सरपंच सीमा आरोंदेकर, पंच ऊर्वी मसुरकर आणि विश्वास चोडणकर, कारापूरची पंच उज्वला कवळेकर तसेच सीताराम सावंत उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात येणाऱ्या आपदग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सरकार आग्रही असते. असे आमदार झांट्ये यांनी सांगून, वादळ आणि पूरग्रस्तांना सरकारकडून निश्चितच भरपाई मिळणार असल्याचे सांगितले. मागील मे महिन्यात डिचोलीतील बहूतेक भागात चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. या चक्रीवादळात मये मतदारसंघातील मये, नार्वे, कारापूर आदी भागात मिळून घरे, बागायतींचे प्रचंड नुकसानी झाली आहे. विश्वास चोडणकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT