Goa Filmcity Dainik Gomantak
गोवा

Goa Filmcity: अखेर गोवा 'फिल्मसिटी'ला भगवती पठारावर मिळाली जमीन

लोलये कोमुनिदादच्या आज झालेल्या भाग धारकांच्या सर्वसाधारण बैठकीत मनोरंजन सोसायटीला भगवती पठारावर जमीन देण्याचा ठराव बहुमताने संमत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Filmcity: लोलये कोमुनिदादच्या आज झालेल्या भाग धारकांच्या सर्वसाधारण बैठकीत मनोरंजन सोसायटीला भगवती पठारावर जमीन देण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला आहे, असे लोलये कोमुनिदाद संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत वारिक यांनी सांगितले.

बैठकीला 54 भागधारक उपस्थित होते, त्यापैकी एकाच कुटुंबातील चार भागधारकांनी ठरावाला विरोध दर्शविला. मात्र, बहुमताने लोलये गावच्या विकासाला हातभार लावण्यासाठी लोलये कोमुनिदाद संस्थेच्या भागधारकांनी हा ठराव बहुमताने संमत केल्याचे वारिक यांनी सांगितले.

यापूर्वी लोलये कोमुनिदाद संस्थेची बैठक व लोलये पंचायतीची ग्रामसभा एकाच दिवशी बोलाविण्यात आल्याने त्या निर्णयाला काही ग्रामस्थांनी व कोमुनिदाद संस्थेच्या काही भागधारकांनी आक्षेप घेतला होता.

त्यानुसार लोलये - पोळे पंचायतीने रविवारी (ता.4) सकाळी 10 वाजता निश्चित केलेली ग्रामसभा पुढे ढकलली होती. तरीही 128 भागधारकापैकी फक्त 54 जण बैठकीला उपस्थित राहिले.

लोलये ग्रामस्थांचा मोर्चा

लोलये कोमुनिदाद संस्थेच्या सर्वसाधारण बैठकीच्या पाश्र्वभूमीवर लोलये ग्रामस्थांनी भगवती पठारावर होऊ घातलेल्या फिल्मसिटी व अन्य प्रकल्पांना विरोध करण्यासाठी आज लोलयेत शांततापूर्ण रॅली काढून निषेध नोंदविला.

ही रॅली लोलये येथील जैव संवेदनशील भगवती पठारावर फिल्मसिटी व अन्य प्रकल्प नको, या मागणीसाठी काढण्यात आली, असे लोलयेच्या जैवविविधता समितीचे अध्यक्ष मनोज प्रभुगावकर यांनी सांगितले. या रॅलीत लोलयेतील सुमारे 150 ग्रामस्थांनी भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT