Goa Film City Dainik Gomantak
गोवा

Goa Film City: गोव्यात फिल्मसिटी उभारणार; जगभरातील चित्रपट निर्मात्यांना मुख्यमंत्र्यांचे चित्रीकरणासाठी आवाहन

Pramod Sawant Film City Announcement: गोव्यात दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठी फिल्मसिटी उभारण्याचा प्रस्ताव आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यात दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठी फिल्मसिटी उभारण्याचा प्रस्ताव आहे. जगभरातील सिनेनिर्मात्यांनी गोव्यात चित्रीकरण करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

५७ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार तथा अभिनेते रवी किशन, खासदार सदानंद शेट तानावडे, माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, गोव्याचे मुख्य सचिव व्ही. कंदवेलू, महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

वेगळ्या धाटणीचे चित्रपट पहा!

ज्यावेळी माझी इफ्फीच्या संचालकपदी नेमणूक झाली त्यावेळी मी नवे काय करणार, असा प्रश्न होता. यंदाच्या इफ्फीची संकल्पना सीमाविरहित कथा राबविण्याचा विचार आला. या महोत्सवात किमान एक चित्रपट असा पहा, ज्या धाटणीचा चित्रपट आपण पाहत नाही, जी भाषा आपल्याला कळत नाही, आपण ज्या देशात यापूर्वी गेलो नाही त्या देशातील चित्रपट पहा, जो दिग्दर्शक आपल्याला माहीत नाही त्याचा चित्रपट पहा. कारण चित्रपट कोणत्याही सीमांमध्ये अडकू शकत नाही आणि आपले विचारही कधी सीमांमध्ये अडकणार नाहीत, असे आशुतोष गोवारीकर म्हणाले.

सिनेमाला सीमांचे बंधन नाही : सिनेसृष्टीतील आपल्या प्रवासाविषयी रवी किशन म्हणाले, की उत्तर प्रदेशातील एका तरुणाने संघर्ष करत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ज्याने हिंदी, भोजपुरी, मराठी, कन्नड, तेलगू, तमीळ भाषांमधून ७०० हून अधिक चित्रपट केले आणि ‘लापता लेडिज’सारख्या चित्रपटाला तर ऑस्कर नामांकन मिळाले. ‘स्पायडरमॅन’सारख्या चित्रपटाचे भोजपुरीत डब केले आणि तो ब्लॉकबास्टर ठरला. सिनेमा हे मनोरंजन आणि मानसिक ताण दूर करण्याचे उत्कृष्ट माध्यम असल्याचे रवी किशन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sandpapergate Scandal: 'उस्मान ख्वाजा सर्वात मोठा गद्दार', सँडपेपरगेट प्रकरणावरुन डिव्हिलियर्सचा संताप; क्रिकेटची बदनामी केल्याचा आरोप

Goa Spice Cultivation: जायफळ, वेलची, काळी मिरीला बाजारात मागणी; गोव्यात मसाला पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Accident News: दोन महिन्यांपूर्वी घेतली कार, 100च्या स्पीडमध्ये 20 फूट हवेत उडून झाडावर आदळली… भीषण अपघातात 7 तरुणांचा मृत्यू

Mohammed Siraj Selection: मोहम्मद सिराजला प्लेइंग-11 मधून वगळण्यावरुन राजकीय वादंग! काँग्रेस नेत्याने तोडले तारे; म्हणाले, 'नावामुळे भेदभाव...' VIDEO

Under 16 Cricket: गोव्याचा पहिला डाव 97 धावांत आटोपला; कर्नाटकने पहिल्याच दिवशी 127 धावांची आघाडी घेत वर्चस्व गाजवले

SCROLL FOR NEXT