आपणच २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा उमेदवार असणार असल्याचा दावा फुर्तादो यांनी केला.  Dainik Gomantak
गोवा

Goa: निवडणुकी पूर्वीच काँग्रेसमध्ये तिकीटासाठी चढाओढ

ज्येष्ठ नगरसेवक (Senior Councilor) व माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो (Former Mayor Surendra Furtado) यांनी पणजी मतदारंसघातून कॉंग्रेस (Congress) पक्षाची स्व घोषीत उमेदवारी जाहीर केली आहे. तर उदय मडकईकर यांनी ताळगावातून लढावे असे सांगितले.

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक (Senior Councilor) व माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो (Former Mayor Surendra Furtado) यांनी आज पणजी मतदारंसघातून कॉंग्रेस (Congress) पक्षाची स्वता:ची उमेदवारी घेषीत केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना फुर्तादो यांनी सांगितले की काही झाले तरी आपणच पणजीत कॉंग्रेसचा उमेदवार असणार आहे. उदय मडकईकर (Uday Madakaikar) कॉंग्रेसमध्ये आल्यांने आपली बाजू बळकट झाली आहे. मडकईकर यांचा प्रभाग ताळगाव मतदारसंघात येत असल्याने ते ताळगावसाठी योग्य उमेदवार आहेत. असेही फुर्तादो म्हणाले. कॉंग्रेस पक्ष एक समुद्र आहे त्यामुळे या पक्षात कुणीही येऊ शकतो. सर्वांचे स्वागत आहे. मात्र त्यांनी पाच वर्षे पक्षाचे काम करावे व नंतरच पदे किवा उमेदावारी मागावी. असे सांगून आपणच २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा उमेदवार असणार असल्याचा दावा फुर्तादो यांनी केला.

कॉंग्रेस पक्ष पक्षात येणाऱ्या कुणालाही उमेदवारीचे आश्‍वासन देत नाही. आपण गोवा निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम व गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्याशी यापुर्वीच चर्चा केलेली आहे. असेही फुर्तादो यांनी यावेळी स्पष्ट केले. ६० कोटी खर्च करुन पणजी महापालिका इमारत बांधणे हे आपले स्वप्न असून ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी पणजीच्या लोकांनी आपणास सहकार्य करावे. असेही फुर्तादो म्हणाले.

महापालिका निवडणुकीत आपण आम्ही पणजीकर हे कॉंग्रेस पक्षाचे पॅनल उभे केले. आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलचे २६ व आपल्या पॅनलचे ४ उमेदवार निवडून आले होते. मात्र दोन्ही पॅनलच्या मतातील फरक फक्त ४९० मतांचा होता. आता उदय मडकईकर हे कॉंग्रेसमध्ये आलेत. येत्या दिवसात आणखी पाच नगरसेवक कॉंग्रेसमध्ये येतील. त्यामुळे येत्या निवडणुकीत आपले स्थान निश्‍चित बळकट होईल.

- सुरेंद्र फर्तादो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT