Goa News | Governor Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

Goa Latest News: गोवा ग्राम संपूर्ण यात्रेचा आज समारोप

Goa Latest News: राज्यपालांनी साधला संवाद : केरळचे राज्यपाल राहणार उपस्थित

दैनिक गोमन्तक

Goa Latest News: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी देशात पहिल्यांदाच गोवा ग्राम संपूर्ण यात्रा करत राज्यातील सर्व मतदारसंघातील जनतेशी सरळ संवाद साधला. त्या यात्रेत प्रामुख्याने नागरिकांकडून पाणी वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या तक्रारी आल्या.

जनतेकडून आलेले प्रश्न, समस्या संबंधित खात्यापर्यंत पोचवल्या असून या यात्रेचा समारोप उद्या सकाळी 11.30 वाजता राजभवनच्या दरबार हॉलमध्ये होणार आहे, अशी माहिती राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन यांनी दिली.

वर्धन म्हणाले, या ग्राम संपूर्ण यात्रेचा समारोप उद्या होत आहे. यासाठी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित राहणार आहेत.

सुमारे 15 महिने चाललेल्या या यात्रेच्या निमित्ताने राज्यपालांनी हजारो किलोमीटरचा प्रवास करून राज्यातील 421 गावे आणि 191 ग्रामपंचायतीतील बहुतांश जनतेशी संवाद साधला. याशिवाय 91 बिगर सरकारी संस्थांना आर्थिक मदत दिली. डायलेसिस, कॅन्सर आणि इतर रोगाने ग्रस्त असलेल्या 1002 नागरिकांना 2.75 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली.

माजी राष्ट्रपतींनी घेतली दखल

देशात पहिल्यांदाच राज्यपालांनी राज्यभर फिरून जनतेशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि प्रश्न ऐकून घेतले. या समस्या संबंधित खात्यापर्यंत पोहोचवत त्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

याशिवाय जनतेतील विविध आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना आर्थिक मदत करत त्यांचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला, याबद्दल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे अभिनंदन करणारे पत्र माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाठविले आहे.

राज्यपाल लिहिणार पुस्तक :

राज्यपाल पिल्लई यांनी राज्यभर फिरून घेतलेल्या अनुभवाच्या आधारे विविध विषयांवरची पुस्तके लिहिण्यास सुरवात केली असून यात राज्यातील वृक्षसंपदा, ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे, सात बेटे या विषयांचा समावेश आहे. या यात्रेमुळे राज्यातील अनेक पर्यटन स्थळे राज्यपालांच्या लेखणीतून नव्याने जनतेसमोर येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

'माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले'? रामा यांच्या पत्नीची पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार

SCROLL FOR NEXT