मुरगाव मतदार संघातील हेडलँड सडा (Headland Sada) येथील जलतरण तलावात (Swimming Pool) पावसाचे पाणी भरून राहिल्याने डेंग्यू, मलेरियासारख्या (Dengue & Malaria) रोगांचा फैलाव होण्याची भीती येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी व्यक्त केली आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना आखण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुरगावचा विकास सध्या युद्धपातळीवर सुरू असून यात अनेक प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर काही प्रकल्पांचे काम अजून रखडलेले आहे. यापैकी एक म्हणजे हेडलँड सडा येथील रोज सर्कल मैदानाजवळील अंदाजे १४ कोटी खर्चून जलतरण तलावाचे काम गेल्या चार वर्षांपासून चालू असून मध्यंतरी काही तांत्रिक कारणास्तव रखडले होते. नंतर मुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या प्रकल्पाचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. (Goa)
दरम्यान या तलावात गेल्या दोन महिन्यापासून पावसाचे पाणी साचून राहिल्याने येथे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या मुरगाव तालुक्यात डेंग्यू, मलेरियाच्य रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली असून चिखली इस्पितळात डेंगू रुग्णांनी खाटा भरलेल्या आहेत. सडा परिसरातील दाट वस्तीत हा जलतरण तलाव बांधण्यात येत असून आत्ताच उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचे येथील समाज कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी सांगितले. अन्यथा डेंग्यू रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.