FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: गोव्यात 6 हजार किलो चिकन नष्ट; नागरिकांच्या ताटात जाण्याआधीच एफडीएची कारवाई

Goa FDA Chicken Seizure: अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम हाती घेतली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम हाती घेतली आहे. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सहा हजार किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे चिकन जप्त करून नष्ट केले.

हे चिकन राज्यातील बड्या हॉटेल्समध्येही पुरवले जाणार होते, अशी माहिती एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांनी दिली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला. एफडीएने वेळीच कारवाई केली नसती, तर हे निकृष्ट चिकन नागरिकांच्या ताटात पोहोचले असते आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या असत्या. विभागाकडून नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येत आहे. सुरुवातीला काजू उत्पादन व संबंधित आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

अफवांवर विश्वास ठेवू नका

समाजमाध्यमांवर प्लास्टिक तांदूळ आणि प्लास्टिक अंडी विक्रीस असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, राज्यात अद्याप असे कोणतेही पदार्थ आढळलेले नाहीत. या केवळ अफवा असल्याचे एफडीए संचालक श्वेता देसाई यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना पॅकेटवरील उत्पादनाची तारीख आणि अंतिम मुदत तपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

मांस विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे : विश्‍वजीत राणे

बेकायदा पद्धतीने चिकनचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. परवाना नसलेल्या पुरवठादारांकडून चिकन खरेदी करणाऱ्या हॉटेलांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिला आहे. चिकनची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करताना अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO: पीएफधारकांसाठी मोठी बातमी! निवृत्तीनंतरही पीएफ खात्यावर मिळणार व्याज; ईपीएफओ आणणार नवा ‘सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन’?

Goa Business Rules: दुकाने 24 तास सुरू ठेवण्याची मुभा; बार, स्पा आणि डान्स बारनाही परवानगी मिळणार का?

Kadamba Transport: कदंबच्या बसेस आधुनिक झाल्या; ग्रामीण भागातील बससेवा, प्रवाशांची गर्दी अन् कर्मचाऱ्यांच्या सुविधांचे काय?

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंसाचाराचा भडका! अवामी लीगच्या आंदोलनाला हिंसक वळण; मोहम्मद युनूस यांचं घर दिलं पेटवून VIDEO

Feast Ground Clash: नावेलीच्या फेस्तात जमीन मालकीच्या वादातून हाणामारी; प्रवेशद्वार बंद केल्याने संघर्ष, दोघे जखमी

SCROLL FOR NEXT