FDA Raid Ponda Dainik Gomantak
गोवा

FDA Raid Ponda: फोंड्यातील मेगा मार्टमध्ये उंदरांचा सुळसुळाट, 'एफडीए'च्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर

FDA Raid: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) विविध ठिकाणी कारवाई करत आहे.

Sameer Amunekar

फोंडा: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) विविध ठिकाणी कारवाई करत आहे. दरम्यान, फोंडा येथील विशाल मेगा मार्टवर सोमवारी (२१ एप्रिल) छापा टाकण्यात आला. या छाप्यादरम्यान काही धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.

तपासणीदरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांना किराणा विभागात उंदरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ काही किराणा वस्तूंच्या पॅकेट्स तपासणीसाठी ताब्यात घेतल्या आहेत.

यावेळी अधिकाऱ्यांना मार्टमधील स्वच्छतेच्या बाबतीतही अनेक त्रुटी आढळून आल्या. उंदरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे अधिकाऱ्यांनी काही वस्तूंच्या पॅकेट्स तपासणीसाठी त्यांनी ताब्यात घेतल्या आहे.

याआधी एफडीएनं बुधवारी (१६ एप्रिल) अन्न सुरक्षेच्या दृष्‍टीने नावेली (सासष्‍टी) व म्‍हापसा येथे कारवाई केली होती. त्यावेळी नावेलीतील एका रेस्टॉरंटमध्‍ये काही त्रुटी आढळून आल्‍या. त्‍यामुळे त्‍या रेस्‍टॉरंटला त्रुटी दूर करण्‍यासाठी सात दिवसांची मुदत देण्‍यात आली होती.

तसंच तिसवाडी तालुक्यातील गोवा वेल्हा, सांतिनेज आणि पणजी परिसरात ‘एफडीए’ धडक मोहीम राबविलीहोती त्‍यात बारा हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट्‌सची तपासणी करून चार आस्‍थापनांना टाळ ठोकण्यात आलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT