Goa FDA Raids Dainik Gomantak
गोवा

FDA Raids: एफडीएची धडक कारवाई! बागा, कळंगुट परिसरात 71 आस्थापनांची तपासणी, दंडात्मक कारवाईसह काजू युनिटला ठोकले टाळे

Goa FDA Raids: एफडीएच्या पथकाने या मोहिमेदरम्यान एकूण 71 व्यावसायिक आस्थापनांची तपासणी केली.

Manish Jadhav

Goa FDA Raids: अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या महिन्यात गोव्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असलेल्या बागा, हडफडे, कळंगुट आणि जुने गोवे या परिसरातील हॉटेल्स, मिठाईची दुकाने, काजू युनिट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या आस्थापनांवर छापेमारी केली. ग्राहकांना सुरक्षित व स्वच्छ खाद्यपदार्थ पुरवले जात आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

एफडीएच्या पथकाने या मोहिमेदरम्यान एकूण 71 व्यावसायिक आस्थापनांची तपासणी केली. तपासणीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक युनिट्सवर अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 च्या कलम 69 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. जुने गोवे आणि हडफडे येथील एका आस्थापनेला मागील तपासणी अहवालातील त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे 7000 चा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय, एकूण पाच आस्थापनांवर कारवाई करताना एका आस्थापनेला 25000 चा मोठा दंड, तर तीन आस्थापनांना प्रत्येकी 10000 चा दंड ठोठावण्यात आला.

काजू युनिटला शट डाऊनचे आदेश

स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करत असल्याचे आढळल्यानंतर एफडीएने ही कारवाई केली. कांदोळी (Candolim) येथील एका काजू उत्पादन युनिटला एफडीएने थेट बंद करण्याचे निर्देश दिले. तसेच, हडफडे परिसरातील इतर 4 आस्थापनांना स्वच्छतेचे निकष पूर्ण करेपर्यंत आपले कार्य तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले. एफडीएने या मोहिमेदरम्यान अनेक काजूच्या दुकानांवर ग्राहकांना अन्न सुरक्षिततेची माहिती देण्यासाठी माहिती फलक देखील लावले आहेत.

गोव्यात (Goa) सध्या पर्यटनाचा हंगाम सुरु असल्याने अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी एफडीए आता डिसेंबर महिन्यात ही तपासणी मोहीम अधिक तीव्र करणार आहे. पर्यटकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा एफडीएने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

Goa Politics: गोवा काँग्रेसची राहुल गांधी, खर्गेंसोबत मीटिंग! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा

Goa News: सरकारी, सार्वजनिक भूखंडांवर राहणार आता कडक नजर! तालुकानिहाय पथके स्थापन; सुट्ट्यांच्या दिवशीही कडक देखरेख

SCROLL FOR NEXT