Goa Agriculture  Dainik Gomantak
गोवा

फोंडा तालुक्यात कृषीधन वाढीसाठी प्रयत्न करा

दैनिक गोमन्तक

फोंडा : फोंडा तालुक्यात मडकई, प्रियोळ, माशेल, माडापै तसेच अन्य काही भागात दुबार शेती घेण्यात येते. मोसमी पिके घेण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. फर्मागुढी, म्हार्दोळच्या चवदार काकड्या बाजारात उपलब्ध आहेत.

त्याचबरोबरच दोडकी, भेंडी पिकही बहरत आहे. या परिसरात अननस, केळी, सुपारीचे उत्पादन घेतले जाते. एकूणच कृषीधन वाढीसाठी सर्वांकडून प्रयत्न व्हायला हवा, असे कृषीखात्‍यासह बागायदारांचेही मत आहे.

राज्यातील फोंडा तालुका हा कृषिप्रधान भाग आहे. शेती, बागायती या भागात मोठ्या प्रमाणात आहेत, त्यातच मोसमी पिकासाठीही येथील शेतकरी आग्रही असल्याने पावसाळाकालीन भाजीपाला तसेच फळांचे उत्पादनही फोंडा तालुक्यातील विविध भागात होते, पण लहरी पावसाचा फटका त्यातच शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी तसेच बागायतदारांना मोठा फटका बसत आहे.

कृषी खात्याच्या उपक्रमांना प्रतिसाद

फोंडा तालुक्यात कृषी खात्याशी निगडित पाच हजारपेक्षा जास्त शेतकरी आहेत. कृषी उत्पादनाकडे मध्यंतरी शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पडिक जमीनही तशी या तालुक्यात मोठी आहे.

कृषी खात्याच्या योजना व उपक्रमांमुळे शेतीला पुन्हा चांगले दिवस यायला लागले असून कृषीधनाला चांगली मागणी असल्याने फोंडा तालुक्यातील भाजी व फळांनाही ग्राहकांची पहिली पसंती मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी बागायतीत विविध पिके घेतली जातात.

कृषी खात्याच्या योजना सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही केली जात असून त्यासाठी संबंधित कृषी खात्यातर्फे बक्षिसेही जाहीर केली आहेत. राज्य भाजीपाला व फळांसाठी आत्मनिर्भर झाले तर साहजिकच रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.

- रवी नाईक, कृषीमंत्री, गोवा राज्य

सरकारने कृषी क्षेत्रासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले आहेत, पण या योजना आणि उपक्रम सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी कृषी खात्याने योग्य प्रयत्न करायला हवेत. योजनांचा लाभ झाल्यास, पुढील काळात चांगले दिवस दिसतील, अशी अपेक्षा आहे.

- प्रभाकर शिवा नाईक, बागायतदार, फोंडा.

मोसमी दोडकी, भेंडी... :

फोंडा तालुक्यात फर्मागुढी, प्रियोळ तसेच बोरी, बेतोडा भागात मोसमी काकडी, दोडकी व भेंडीची लागवड पावसाळ्यात केली जाते. चवीमुळे या भाजीला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळेच फोंडा, फर्मागुढी, म्हार्दोळ, मंगेशी, बोरी तसेच कुर्टी आदी महामार्गावर छोट्या गाड्यांवर पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या या भाजीला ग्राहकही चांगला मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT