Goa Farming प्रगती सोपटे, जयराम नाईक आदींनी भाषणे केली. Dainik Gomantak
गोवा

पार्से खाजन गुंडो परिसरातील शेतीसाठी मिळणार सर्वतोपरी मदत..!

दैनिक गोमन्तक

मोरजी : पार्से येथील खाजन गुंडो परिसरातील किमान ३० लाख चौरस मीटर शेती (Goa Farming) पंडीग न ठेवता पूर्णपणे ओलीतीखाली आणावी आपले सर्व तो परी सहकार्य मिळणार आहे त्यात नांगरणी पासून ते मळणीपर्यंत यंत्रणा उपलब्ध करून देणार सर्व यंत्रणा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही आमदार दयानंद सोपटे यांनी पार्से पंचायत सभाग्रहात पार्से गावातील शेतकऱ्यांच्या सभेत सांगितले.

पार्से खाजन गुंडो या भागातील मोठ्या प्रमाणात वायंगणीशेती पडिंग ठेवण्याचा प्रकार घडत आहे. याची आमदार दयानंद सोपटे यांनी गंभीर दखल घेवून सर्व शेतकऱ्यांची १७ रोजी बैठक बोलावली होती. त्यावेळी स्वयंमित्र श्री कारापूरकर, पेडणे कृषी अधिकारी प्रसाद परब, सरपंच प्रगती सोपटे, उपसरपंच अजित मोरजकर, पंच ममता सातर्डेकर,धीरज परब जलसिंचन अधिकारी श्री हरमलकर, शेतकरी श्रीराम साळगावकर, प्रदीप परब, मिलिंद तळकर, जयराम नाईक आदी उपस्थित होते.

अन्यथा आपण शेती करणार

यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आम्ही शेती केली तर आपल्या शेजारची शेती पडिंग ठेवली जाते त्यामुळे आम्हाला अडचणी येतात असे सांगितल्यावर आमदार दयानंद सोपटे यांनी जे कोणी शेती पडीग ठेवणार त्यांची शेती आपण करणार आहे शेतकऱ्यांना घेवून मग कोणी विचारायला येतो त्याना येवू दे असा इशारा दिला.

शेतीसाठी कोणत्याच अडचणी येणार आणि आणि तुमचा आमदार हा शेतीसाठी प्राधान्य देणारा आहे असे सोपटे म्हणाले.

वाईट वाटते ?

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना गेल्यावेळी पार्से गावातील १३५ लोकाना ५० किलो बियाणी २५ किलो खत मोफत दिले होते, सांगायला वाईत वाटते त्यात किती जणांनी शेती केली असा सवाल करून पुन्हा असे करू नका असे आवाहन करून आता जो कोणी नागरणार शेती करणार त्यालाच सर्व तोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली.

आम्ही जनतेचे नोकर

सरकार तुमच्या दारी या उपक्रमांतर्गत सरकारने प्रत्येक पंचायतीला स्वयं मित्राची नेमणूक केल आहे, नागरिकांनी दर शनिवारी आपल्या व परिसरातील समस्या मांडायला हव्यात परंतु काही पंच सदस्यच उपस्थित नसतात, जो मोठ्या आस्थेने ग्रामस्थांनी पंच आणि आमदार निवडून देतात ते जनतेचे नोकर असतात त्यांनी वेळेवर उपस्थित लावून नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा असे आमदार दयानंद सोपटे म्हणाले.

आमदार दयानंद सोपटे हे मुद्दाम शेती व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी विविध योजना राबवत असतात त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी प्रसाद परब यांनी केले.

शेतीमुळे व्यायाम

जाणत्यांनी जी शेती राखून ठेवली तीच शेती आम्हाला पुढच्या पिढीला सुरक्षितपणे ठेवायला हवी पूर्वी जाणकार मंडळी कुठल्या व्यायाम शाळेत जायचे ते तर नियमित पहाटे उठून शेतात जायचे शेतीची कामे करायचे त्यातून त्याना नियमित व्यायाम मिळत असे आताही युवकांनी शेतात राबवून शेतीकडे काळ देण्याचे आवाहन केले.

अन्यथा शेती भाटकार ताब्यात घेवू शकतात

कुळाची शेती जमीनदारांनी तुम्हाला कसवून खाण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी दिली आहे, ती केवळ ज्याचा उल्लेख कुळ म्हणून आहे त्यांनीच करायला हवी, परस्पर तिसऱ्याला दिली तर ती शेती भाटकर घेवू शकतो. शेट जमनीची नासाडी केली किंवा बांधकाम केले तरी सुधा भाटकर किंवा शेती पंडीग ठेवली व खंड दिला नाही तरीसुद्धा भाट्कार आपली शेती घेवू शकतो, असे कृषी अधिकारी प्रसाद परब यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजुणेत थार गाडीची दुचाकीला धडक; तिघेजण गंभीर जखमी

ISL 2024-25: आगामी लढतीसाठी FC Goa संघात होणार बदल? मार्केझ यांनी दिले संकेत

Konkan Railway: धावत्या रेल्वेतून कोसळली विद्यार्थ्यांनी, RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वचावली Video

Mopa Airport: ...तर सरपंचांनी राजीनामे द्यावेत! ‘मोपा’तील नोकऱ्यांवरुन जनसंघटना आक्रमक

Mandrem: सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मांद्रेत ग्रामस्थांच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT