गोवा केवळ त्याच्या समुद्रकिनाऱ्यांसाठीच नाही, तर त्याच्या 'फेनी'साठी देखील प्रसिद्ध आहे. फेनी ही एक प्रकारची दारू आहे, जी एका खास पद्धतीने तयार केली जाते. आज आम्ही तुम्हाला फेनीबद्दल काही मनोरंजक माहिती सांगणार आहोत.
गोवा हे पर्यटन, वारसा तसेच मनोरंजनाचे ठिकाण म्हणुनही प्रसिध्द आहे. गोवन देशी दारु म्हणुन ओळखली जाणारी 'फेनी' हि पर्यटकांसोबतच स्थानिकांचे पण आकर्षणाचं केंद्र आहे. समुद्रकिनारे, चर्चसोबतच गोवा हे मद्यप्रेमींसाठीही मोठ्या आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे.
फेनी हे स्थानिक पातळीवर तयार केलेले पेय असून ते फक्त गोव्यात मिळतं. गोव्यातील कोणत्याही स्थानिक दुकानात किंवा बाजारात फेनी सहज मिळून जाते. गोवा सरकारने 2009 मध्ये फेनीला जियोग्राफिकल इंडिकेशन ( GI ) प्रमाणपत्र दिलेलं होतं.
फेनी हा शब्द संस्कृत शब्द फेना पासून आल्याचे सांगण्यात येतं. गोवा १५१० मध्ये पोर्तुगीज साम्राज्याच्या ताब्यात आला. पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी गोव्यात काजूच्या झाडांची लागवड सुरू केली, कारण त्या काळात गोव्यात काजू आणि त्याच्या उत्पादनाचा मोठा बाजार होता.काजू फळाच्या रसाचा वापर पोर्तुगीज लोकांनी मद्य उत्पादनासाठी केला.
स्थानिक लोक, पर्यटक, आणि गोव्यात येणारे अनेक जण फेनीचा आनंद घेतात. यामुळे गोव्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील फेनी समाविष्ट असते.
फेनीचा वापर फक्त वाईनसाठीच केलं जात असं नाही, तर औषधही करण्यासाठी देखील केलं जातं. दातांच्या समस्या, हिरड्या सूजने, आणि तोंडातील होणाऱ्या आजारावर फेनी गुणकारी ठरतं. फेनीत अल्कोव्होलची मात्रा 43 % ते 45 % पर्यंत असतो.
गोव्याच्या परंपरेत फेणीला सांस्कृतिक महत्त्व आहे. सण, उत्सव आणि विशेष प्रसंगी फेणीला महत्व आहे. फेणी ही राज्याच्या वारशाचा एक भाग मानली जात असून, स्थानिक जीवनशैलीत खोलवर रुजलेला आहे.
फेनीचे फायदे
फेनीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि हर्बल गुणधर्म असू शकतात, ज्यामुळे पचनप्रणालीस मदत होऊ शकते. फेनीमध्ये असलेल्या अल्कोहोलचे प्रभाव तणाव आणि चिंतेतून मुक्त होण्यास मदत करू शकतात, पण यासाठी ती अधिक प्रमाणात पिणे हानिकारक होऊ शकते.
पारंपरिक पद्धतीने काही लोक फेनीचा वापर सर्दी आणि जुखामच्या लक्षणांवर आराम मिळवण्यासाठी करतात.
फेनीचे दुष्परिणाम
फेनीमध्ये उच्च प्रमाणात अल्कोहोल असतो, त्यामुळे त्याचे अधिक सेवन शरीरावर हानिकारक परिणाम करू शकते. त्यामुळे लिव्हर किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचे धोके वाढतात. जास्त प्रमाणात फेनी पिण्यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या होऊ शकतात, जसे की चिंता, ताण, डिप्रेशन
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.